नवीन लेखन...

आकांत

विखुरल्या त्या वाटा साऱ्या, भावनेचाही झाला अंत, अंधत्व आले, दिशा हरवल्या, ना उरली हृदयास मनाची खंत !! दुःखाने पायघड्या अंथरल्या , अश्रूंनी खारे गालिचे पांघरले , किर्र किर्र त्या काजव्यांसारखे, अंधाऱ्या रात्रीत तांडव माजले !! विटले धागे सुखी नात्याचे, आकांत करुनी निष्ठुरले मन, भासत होते मृगजळ ते सुखाचे , उरले हाती सुतकी जीवन !! — श्र्वेता […]

स्त्री

लाजेची मशाल नयनी, नाकात नाजूक नथनी, लाल ओठ गुलाबी छान, स्त्री तू सौंदर्यांची खाण… झुपकेदार शेपूट कुंतलेचं, मुक्त कमरेवरी रुळलेलं, शान तूझ्या मोहक स्त्रित्वाची, गुंफुनी गजऱ्यामध्ये माळलेलं… उडे ऐटीत डौल पदराचा, कुंपण घाली मंद वारा, झाकाळलेल्या या रुपासमोरी, फिक्या त्या लखलखणाऱ्या तारा… कामिनी गं तु योवणाची, वसुंधरेची अभिमानास्पद मान, अंकुश घाली स्त्रिशक्तिवर, हे शृंगारिक देह वरदान… […]

तो

सहवास होता तुझा, सदोदित साथ देणारा…! संयम होता तुझा, माझे बोल झेलनारा…! जिद्द होती तुझी, नितांत प्रेम करण्याची…! तुझ माझ नातं कस्तुरीचं, एक थेंब सागरात मिसळलेलं….! एक थेंब सागरात मिसळलेलं….! – श्र्वेता संकपाळ

प्रेम अर्ध्या वाटेवरचं

मागून जे मिळतं ते कवडीमोल ठरतं, अमूल्य असूनही, भावनांच्या कचाट्यात पडतं, थोडं झुलतं – थोडं डुलतं, थोड रडून पुन्हा हासतं, तरी मनाच्या हिंदोळ्यावर , निवांत बहरत असतं, प्रेम अर्ध्या वाटेवरचं, काट्यासारखं रुतून बसतं, कारण मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! मागून जे मिळत ते कवडीमोल ठरत…! – श्वेता‌ संकपाळ

यशोगाथा

Ideal hero तुम्ही आमचे, नेहमी स्वाभिमानानेच जगलात, रात्रीचा दिवस केलात, पण परस्थितिसमोर नाही झुकलात!! तुमचा गौरव पाहुनी , आज मनही झाले तृप्त, जन्मदाते तूम्ही आमचे, शब्दही झाले सुप्त!! संस्कारांची दिली शिदोरी, त्यास गरजेची नाही तिजोरी, कर्तव्य पूर्ती करून यथांग, कधी खेळलीत बालपणीची लगोरी!! अभिमानाने मान उंचावली, आकाश आम्हा ठेंगणे झाले, आनंद गगनी भिडला आमचा, यशात मी […]

सागर- किनारा

सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये , एकदा झाला मोठा वाद, सागराचे रौद्र रूप पाहूनी, किनाऱ्याने दिलीच नाही साद… फेसाळलेल्या लहरी मधुन, तो ओकत होता आग, सूर्य गेला समजवण्यास , पण तोही झाला बाद… खवळलेल्या लाटांनी मग, मस्तक आपटले किनाऱ्यावर, हळूच वरती पाहुनी, शिंपडले पाणी सूर्यावर… शेवटी चमचमत्या चांदण्यांचं, आकाश आले भेटीला, सुंदर शांत संध्या, होती त्यांच्या जोडीला… आक्रोश […]

एकटी मी

ना भावना, ना कल्लोळ मनी, ना अश्रु, ना हास्य नयनी, ना ध्यास, ना दिशा माहित, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! एक चंद्र , एक तारा, एक एकटा एकांत सारा, एक एकट्या जीवनात माझ्या, ज्योती असूनही काळोख सारा, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! नको सोबत, नको आधार कोणाचा, बस आहे आशिर्वाद माय – […]

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

आपलं माणूस

काही गोष्टी फक्त आपल्या माणसांसाठी असतात. त्यावर नाव आपलं पण हक्क फक्त त्यांचा असतो ! कर तु तुला हवं ते, ती दणदणीत पाठीवर थाप असते, आनंदात सहभागाची छोटीशी वाट हवी असते..! काळ आणि वेळेनुसार सर्व बदलायचं असतं, आपलं माणूस मात्र जिवापाड जपायचं असतं..! – श्र्वेता संकपाळ

प्रणय गंध

अंगणात सडा फुलांचा, परी गंध तूझ्या देहाचा, साम्य नाही दोहोंत मुळीच, मला फक्त तू हवा-हवासा! आसुसलेल्या नयन कडांवर, भिरभिरे आता रंगीत वारा, सप्तरंग आकाशी इंद्रधनुचा, नभ धरी डोई वर्षाधारा ! चंद्रबिंब तुझ्यात भासे, सूर्यकिरण उरात दाटे, विरहाचे भोगले मी काटे, संयोगाची ही वेळ वाटे ! बाहुपाशाचा वेढा तनुला, नटखट सुटण्याचा माझा चाळा, कुंतला मुक्त, बटा रुळती […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..