Avatar
About श्वेता संकपाळ
Ms. Shweta Kashinathi Sankpal. Born at Satara Dist. in 16 Dec, 1994. Spend all childhood & education in Thane. My hobbies to make poems ,to give speech, to handle new subject, to do debate & anchoring etc. I did Msc in organic chemistry.
Contact: Facebook

समाज

होऊन गेले नकळत सारे, सुचले मला काहीच नाही, होकार फक्त मनाचा, मेंदूला त्याची कल्पना नाही… समाज ठेवतो सतत नावं, करतो त्याची कुजबूज…! असते ती फक्त छोटीशी चूक, वारंवार बसतो चर्चेचा त्याला मारा, करतो एक,भोगतो एक, मात्र मज्जा बगतो समाज सारा… अहो, खरं कोन? समाज की मी? या प्रश्नाचं उत्तर मात्र दडून बसतं ज्याला जसे पाहायचे तो […]

व्यथा एका शेतकऱ्याची

कोणी म्हणे बाप माझा शेतकरी, झीजतो राञं-दिस कर्तव्यापोटी, घेवून वाड वडिलांची आण, बनवी काळ्या मातीस सोन्याची खाण.. जवान मरतो देशासाठी, लाभते त्यास वीरमरण प्राप्ती, मी पिकवतो पोटाच्या खळगीसाठी, तरी गळफास-उपासमार माझ्याच माथी… अवचित दुष्काळ अन् पाणीटंचाई, निसर्ग कोपाची भलतीच घाई, उजाड माळरान फाटकी धरती, कळोखांचा नभ डोळ्यांनभावती… मान- सन्मान- सत्ता नाही, काळी काया, हाडावर मुठभर मांस […]

नशा

नशा नशिली तूझ्या प्रेमाची, अंग अंग सरसरली, शृंगारले मन हे माझे, जेव्हा तू घट्ट मिठी मारली ! मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने ! दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले ! कवेत तू माझ्या अथांग, मी तुला घट्ट कवटाळले, ‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास, […]

मैत्री तुझी माझी

मैत्री आपली की आपण मैत्रीचे उदाहरण? तू हसावं, मी त्यात विरावं, आनंदाच्या ओघात, मी मिठीत तुझ्या शिरावं, मी मिठीत येताना, हलकीच एक खोड करावी, तू खोट खोट रागवताना, ती गमतीत रुपांतर व्हावी… तू आणि तुझा चेहरा, त्यात फक्त तू असावी, तुझ्याव्यतिरिक्त मला त्यात माझी झलक दिसावी… तू आणि मी कधी एकमेकांचे होऊन गेलो कळलच नाही, भान […]

विठ्ठल विठ्ठल

अवघ्या जगाचा संसार पेलून, विटेवरी उभा तू कमरेवर हात ठेवून, समाधान दिसे डोळ्यात, दिसे स्मित हास्य तूझ्या ओठी, काळा सावळा विठू तू माझा, कीर्ती अथांग तुझी मोठी…. – श्वेता संकपाळ.

भारतीय

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी….. भारतीय ! (१५-०८-२०१८) नको हो माण, नको हो पैसा, नको तो वायफळ जातीवाद, कानी पडावी एकच गोष्ट, भारतीय असल्याची तीक्ष्ण साद…!! जो तो उठतो लढत बसतो, वैयक्तिक वाद कुठेच नसतो, सोडता ठिणगी राजकारण्यांनी, हल्लाबोल कसा अंगी सळसळतो?!! थोडातरी विचार करावा, समजून उमजून निर्णय घ्यावा, एकजात उरात आम्ही भारतीय, अंती भारत […]

आहुती

काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटले, त्या व्यक्तीविषयी, तिच्या आयुष्याविषयी ऐकल्यावर खूप वाईट वाटले….त्यावर सुचलेल्या काही ओळी आहुती! (१४-०८-२०१८) अशीच अगतिक झाले होते, स्वप्न झुल्यावर झुलत होते, मी प्याला त्याच्या प्रेमाचा, अमृत समजुनी पित होते… ओवला मणी त्याचा नावाचा, भाळी कुंकुम टिळक लावले, होम पेटला संसाराचा, आहुती म्हणूनी स्वतःस चढवले… रोज रोजचे तंटे वाजले, अंगी लाल […]

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

नशा

“नशा” नशा नशिली तूझ्या प्रेमाची, अंग अंग सरसरली, शृंगारले मन हे माझे, जेव्हा तू घट्ट मिठी मारली ! मोहरुन सर्वांग आले, तूझ्या एका स्पर्शाने, ऊर दाटून आला, तूझ्या रोमांचित गंधाने ! दिवानी मी तुझीच प्रियकरा, पूर्णत्वाने वेडावलेस, बांध फुटला भावनांचा, कुशीत तुझ्या विसावले ! कवेत तू माझ्या अथांग, मी तुला घट्ट कवटाळले, ‘ मिलन ‘ पीयुष […]

1 2 3