नवीन लेखन...

काश्मिर

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांचा काश्मिर प्रश्नावरील हा लेख शेअर करत आहे… गेल्या दहाबारा वर्षात हळुहळू काश्मिरचा कधी पॅलेस्टाईन होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. वीसपंचवीस वर्षापुर्वीचे पॅलेस्टाईनचे फ़ोटो कुठे मिळाले तर मुद्दाम शोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचिती येईल. यापुर्वी निदान काश्मिरमध्ये हुर्रीयत व फ़ुटीरवादी निवडणूकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण कुठे […]

म्युच्युअल फंड

नमस्कार… मी म्युच्युअल फंड बोलतोय….. खूप वर्षांपासून तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती. खरं तर तुमच्यावर खुप अारोप करायचेत, तक्रार करायचीय जमलंच तर हक्कानं रुसुनही बसायचंय, पण हे सगळं नेमकं कधी करावं हेच कळत नव्हतं. काय अाहे ना कि, अापण जो पर्यंत स्वत:ला सिद्ध करत नाही, तो पर्यंत कुणी अापल्याला हिंग लावुन विचारत नाही हेच खरं…. अाता शेअरबाजार […]

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं

योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं……. 1) जॉब हेक्टिक आहे ( कुणाचा नसतो ?) 2) वेळच मिळत नाही ( सर्वांनाच 24 तास मिळतात !) 3) खूप काम असते ( रिकामटेकडा कोण असतो ?) 4) अभ्यास खूप असतो कॉलेजात ( काय दिवे लावणार आहात ?) 5) घरी जाऊन पण काम असते ( आम्ही पण कामं […]

निर्लज्ज..

भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली… आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली… माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली तरीही मला लाज नाही वाटली…. लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची…! त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं… आणि त्याच्याच […]

प्रेम कुणावरही करावे

‘प्रेम कुणावरही करावे’..ही कुसुमाग्रज यांची ही अत्यंत गाजलेली आणि आपल्याला अंतर्मुख करणारी कविता. प्रेम कुणावर करावं ? कुणावरही करावं प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं, भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं, दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं। प्रेम कुणावरही करावं। प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं, बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह […]

वनवास तिच्या जरी वनीचा !

जहाल क्रांतिकारक श्री अरविंद यांच्याविरोधात ब्रिटिशांनी कारवाईची तयारी सुरू केली तेव्हा त्यांच्या अंतर्मनात माणसाच्या आत्मिक स्वातंत्र्याचा विचार प्रकटला. त्याकरिता योगाभ्यासासाठी म्हणून ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पॉंडिचेरीला आले. तिथला त्यांचा मुक्काम म्हणजे खरे तर प्रथम अज्ञातवासच होता. तरी त्यांचे वास्तव्य ब्रिटिश गुप्तचरांच्या लक्षात आले आणि त्यांच्या हेतूंबद्दल संशय असल्याने ब्रिटिश तसेच फ्रेंच गुप्तहेरांची त्यांच्यावर पाळतही होती. नंतर […]

मोबाईल

ही कविता लिहिणा-या कवीला त्रिवार वंदन ! मम्मी सोड मोबाईल माझ्या सोबत बोल थोडावेळ बागेमध्ये खेळु आपण चल…! सोबत तुला नेहमी मोबाईल लागतो केवळ घरी आल्यावर तरी घे ना मला जवळ…! रात्रभर मोबाईल असतो तुझ्या उशाला तरीसुद्धा दिवसभर सोबत ठेवते कशाला…? पप्पा आज मोबाईल ऑफिसमध्ये विसरा माझा चेहरा होईल आनंदाने हसरा…! दिवसभर मोबाईल तुम्ही हातात धरता […]

हरलाय महाराष्ट्र… आणि हरलाय मराठी माणूस…

कोणी म्हणतोय भाजप जिंकला, कोणी म्हणतोय शिवसेना हरली, कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर, कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे, कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली… पण लक्षात ठेवा इथे फक्त  “जिंकलाय” आणि पुढे गेलाय तो… गुजराथी, मारवाडी, भैया, मद्रासी, सिंधी, पंजाबी, आणि हरलाय आणि तो फक्त माझा “महाराष्ट्र”… आणि माझ्या महाराष्ट्रातील “मराठी माणूस”… आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल … महाराष्ट्रात राहून जर […]

1 9 10 11 12 13 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..