वास्तववादी चित्रकार एस. एम. पंडीत
१९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली. […]
