ग्रीन टीच्या संशोधिका मिशियो शुजीमुरा
शुजीमुरा यांना हायस्कूल मध्ये असल्यापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली.१९२० मध्ये, त्यांनी आपले लक्ष वैज्ञानिक संशोधक बनण्यावर केंद्रित केले आणि होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरुवातीला रेशीम कीटकांच्या पोषणावर संशोधन सुरू केले, परंतु १९२२ मध्ये त्यांची जीवनसत्त्व संशोधक उमेटारो सुझुकी यांच्यासह टोकियो इम्पीरियल विद्यापीठात बदली झाली. इथे मिशिओने ग्रीनच्या बायोकेमिस्ट्रीवर संशोधन केले. दोन वर्षांनंतर, त्यांनी आणि त्यांचे सहकारी सितारो मिउरा यांच्या सह ग्रीन टी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याचा शोध लावला, ज्यामुळे उत्तर अमेरिकेत ग्रीन टीची निर्यात वाढली. […]
