नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ संपादक पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे

उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत. […]

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी

१९५३ साली त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. १९६१ मधील अध्यक्षीय निवडणुकींत ते रिचर्ड निक्सन यांच्या विरुद्ध उभे ठाकले व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्यांनी खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. […]

युरोप मधील सिबलिंग डे

असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने सिबलिंग डे साजरा करण्याची कल्पना दिली. यासाठी त्यांनी सिबलिंग फाऊंडेशनची स्थापना केली, ज्याला अमेरिकन कॉंग्रेसने एकमताने मान्य दिली. यानंतर दरवर्षी १० एप्रिल रोजी सिबलिंग डे साजरा करण्यास सुरुवात झाली.असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. […]

अभिनेता विलियम जोसेफ लारा

मॉडेलिंगपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टार्झनमध्ये मुख्य भूमिका साकारली. 1996 ते 1997 मध्ये बीच ऑन एयर झालेल्या टार्झन सीरीजच्या 22 एपिसोडमध्ये ज्यो ने प्रेक्षकांवर छाप सोडली. ज्यो ने टार्झनसह अमेरिकन साइबॉर्ग स्टील वॉरिअर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड आणि टीव्ही मालिका वेवॉच आणि कोनान द ॲ‍डव्हेंचरमध्ये काम केले होते. 2018मध्ये आलेल्या समर ऑफ 67मध्ये तो झळकला होता. ज्यो ने ग्वेनसोबत लग्न केले होते. दोघेही ब्रेंटवुडमध्ये आपल्या दोन मुलींसोबत रहात होते. […]

दिग्दर्शक सुनील सुकथनकर

२०१४मध्ये आलेला ‘अस्तु’ हा विस्मरणाच्या आजारावर आधारित चित्रपट होता. यातली प्रा. चक्रपाणींची भूमिका डॉ. मोहन आगाशे यांनी सुंदर साकारली आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे. यातली इरावती हर्षेची भूमिकाही पाहण्यासारखी आहे. ‘अस्तु’ चित्रपट चांगला असला, तरी सुरुवातीला तो मर्यादित ठिकाणीच प्रदर्शित झाला. पुढं त्याला अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर काही संस्थांनी ‘क्राउड फंडिंग’ करून तो पुन्हा प्रदर्शित केला. […]

जागतिक तंबाखूविरोधी दिन

तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून; एकटया मुंबईत हे प्रमाण 25.4 टक्के आहे. याशिवाय लहान मुलांतही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे. […]

शास्त्रीय आणि सुगम संगीत गायक विनोद शेंडगे

ध्यात्म आणि भारतीय वेदांताचा अभ्यास करण्याची आवड असल्याने दोन वर्षे आळंदीमध्ये राहून भारतीय विद्याभवनची ‘किर्तन कोविद’ ही पदवी घेऊन किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची कलाही त्यांनी आत्मसात केली. त्यानंतर बीकॉम करण्यासाठी पुन्हा पंढरपूरमध्ये आले. त्यावेळी डॉ. विकास कशाळकर यांच्या सान्निध्यात राहून शिकताना शब्दब्रम्ह आणि नादब्रम्ह हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या ‘रयतेचा राजा राजा शिवछत्रपती’ या नाटकाला पार्श्वसंगीत दिले आहे. […]

ज्येष्ठ दिग्दर्शक वसंत पेंटर

वाङ्मयीन कथा ही चित्रपटासाठी आवश्यक असते कारण ती शाश्वत असते, ही वसंतरावांची महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून पक्की झालेली भावना. त्यानुसार त्यांनी प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा ग्रामीण चित्रपट दिग्दर्शित केला. जयश्री गडकर, सूर्यकांत, राजशेखर यांनी कामे केलेला हा चित्रपट गाजला. यानंतर परत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर वसंतरावांनी ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट केला. तोही यशस्वी झाला. द. का. हसबनीस या साहित्यिकाने लिहिलेला, ४२च्या स्वातंत्र्य चळवळीवरील ‘सुगंधी कट्टा’ हा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. पण ‘पाच नाजूक बोटे’ या लोकप्रिय लेखक बाबा कदम यांच्या कथेवरील रहस्यमय चित्रपट होय. यानंतर मात्र वसंतरावांनी स्वत:ची चित्रपटनिर्मिती सुरू केली. बाबा कदमांच्याच कथेवर त्यांनी ‘दगा’ हा चित्रपट काढला. ‘ग्यानबाची मेख’ हा विनोदी चित्रपट काढला. […]

अभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस

अनेक स्पर्धांपैकी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी आले होते. त्यांनी त्यांचा अभिनय पाहिला आणि बिनधास्त चित्रपटासाठी विचारले. ह्या चित्रपटामुळे त्यांची अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटासाठी त्यांना व्हिडिओकॉन स्क्रीन आणि फिल्मफेअरची अभिनयाची पारितोषिके मिळाली. पण त्यांचा पहिला चित्रपट मात्र ‘सरकारनामा’ हा होय. १९९९ मधील चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘बिनधास्त’ चित्रपटानं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटामधील ‘वैजयंता’ ही भूमिका गाजली. ‘मायबाप’, ‘पाश’, ‘कायद्याचं बोला’, ‘सरकारनामा’, ‘मिशन चॅम्पियन’, ‘सावरखेड एक गाव’ हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट. […]

प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड

भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत. कालिदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले. […]

1 43 44 45 46 47 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..