रसिकांवर मोहिनी घालणारे कवी, गीतकार जावेद अख्तर
जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच […]
