नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ गायक कुंदनलाल सैगल

कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो. ‘जब दिल ही […]

हिंदी पटकथालेखक व अभिनेत्री हनी ईरानी

हनी ईरानी यांना डर, कोई मिल गया, और लम्हे साठी ओळखले जाते. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९५५ रोजी झाला. त्या लेखक व अभिनेत्री आहेत. मा.हनी ईरानी या मा.जावेद अख्तर यांची पहीली पत्नी आहेत. योगायोग हा की हनी ईरानी यांच्या वाढदिवसाबरोबर मा.जावेद अख्तर यांचा पण वाढदिवस असतो. १९७२ मध्ये त्यांनी लग्न केले. फरहान अख्तर व जोया अख्तर ही मा.हनी ईरानी व […]

जेष्ठ निर्माता-दिग्दर्शक कमल अमरोही

कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला. कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर […]

बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बो’ – अभिनेत्री सुचित्रा सेन

सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक […]

महाराष्ट्र गंधर्व सुरेश हळदणकर

स्वरराज छोटा गंधर्व व पं. कुमार गंधर्व यांचे समकालीन असलेले परंतु फारसे परिचित नसलेले असे एक गंधर्व म्हणजे ‘महाराष्ट्र गंधर्व’ सुरेश हळदणकर. ते गोमांतकात जन्मले. गाणे शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आले. त्यांना पं. बापुराव केतकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. त्याच सुमारास गोविंदराव टेंब्यांकडून काही नाट्यपदांचीसुद्धा तालीम मिळाली. सुरेश हळदणकर हे मा. दीनानाथ, बालगंधर्व व मा. कृष्णराव […]

रसिकांवर मोहिनी घालणारे कवी, गीतकार जावेद अख्तर

जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच […]

संगीताचे जादूगार ओ. पी. नय्यर

ओ. पी. नय्यर यांचे पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर प.पंजाब येथे झाला. १९४९ मधे ” कनीज” या चित्रा पासून संगीतकार म्हणून कारकीर्द ओ.पी.नी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले. दलसुख पांचोली यांच्या “आसमान” […]

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडेमी) स्थापना दिन

सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. पुणे शहराजवळ खडकवासला येथे ही संस्था असून तिन्ही सैनिकी दलांचे प्राथमिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सोय या संस्थेत आहे. भूसेना, नौसेना व वायुसेना या दलांतील अधिकाऱ्यांचे शिक्षण सुरुवातीस एकत्र केले जावे, या उद्देशाने १९४५ साली तत्कालीन हिंदुस्थान सरकारने नॅशनल वॉर अकॅडेमी वर्किंग कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष फील्ड मार्शल सर […]

कलामहर्षी बाबूराव पेंटर

दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक […]

आर्मी डे

भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते. भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे. भारतीय लष्कराची […]

1 380 381 382 383 384 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..