देविका राणी
देविका राणी चौधरी हे देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या ‘लाइट ऑफ एशिया’ या […]
