नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

देविका राणी

देविका राणी चौधरी हे देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या ‘लाइट ऑफ एशिया’ या […]

भारतीय सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून […]

आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस

आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते.या आर्थिक वर्षाला निरोप देण्याआधी प्राप्तिकराच्या बाबतीत काही आवश्यीक कामे आपण ३१ मार्चआधी न विसरता करून घ्यायला हवीत, प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता आपले मागील दोन आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की जर आपले आर्थिक वर्ष […]

अभिनेते आणि विनोदवीर जगदीप (सूरमा भोपाली )

सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. त्यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला. जगदीप अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणुन त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानतंर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या […]

२९ मार्च १९३० – ‘प्रभात’चा ’खूनी खंजीर चित्रपट प्रदर्शित

२९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न […]

हिंदी, बंगाली सिनेमातील अभिनेता, निर्देशक, लेखक, नाटककार उत्पल दत्त

उत्पल दत्त हे उच्च दर्जाचे अभिनेता, दिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांचा जन्म २९ मार्च १९२९ रोजी झाला. त्यांनी केवळ बंगाली चित्रपट वर आपली छाप टाकली नाही तर हिंदी चित्रपटावर पण. सीरियस पासून कॉमेडी पर्यंत त्यांनी प्रत्येक भूमिका अतिशय गंभीरपणे केली. मा.उत्पल दत्त यांचे शेक्सपियर साहित्यावर खूप प्रेम होते. १९४० मध्ये एका थिएटर कंपनीतून आपल्या अभिनयास सुरवात केली. थिएटर कंपनीतर्फे […]

जेष्ठ बॉलिवूड, व बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन

मुनमुन सेन यांचे खरे नाव श्रीमती देव वर्मा आहे. त्यांचा जन्म २८ मार्च १९४८ रोजी कोलकाता येथे झाला.शिलाँग येथील लॉरेंटो स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुनमुन यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांची कन्या. तर मुनमुन यांच्या मुली रिया सेन आणि रायमा सेन या देखील बॉलिवूड […]

गायक भरत बलवल्ली

खड्या आवाजातली पांढरी सहा ची अद्भुत गायकी असलेले भरत बलवल्ली यांचा जन्म २८ मार्च १९८८ रोजी झाला. भरत बलवल्ली हे लहान वयातच शास्त्रीय संगीतात स्वत:चा दरारा निर्माण करणारं व्यक्तिमत्व! प्रेक्षकांची पकड घेणारा आणि तीनही सप्तकात लीलया फिरणारा आवाज; विलंबीत, मध्य आणि द्रुत अशा सर्व लयीत त्यांच्या आवाजातून व्यक्त होणा-या भावना ही सर्व भरत बलवल्ली यांची बलस्थानं आहेत. भरत भरत बलवल्ली […]

जेष्ठ अभिनेत्री प्रिया राजवंश

प्रिया राजवंश यांचे खरे नाव वीरा सिंह. शालेय शिक्षण सिमल्यातलंच. शाळेत असताना त्यांनी अनेक इंग्रजी नाटकांत अभिनय केला होता. वनविभागात कंजरवेटर म्हणून काम करत असताना प्रिया राजवंश यांच्या वडिलांना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले होते. प्रिया राजवंश सुद्धा त्यांच्याबरोबर लंडनला गेल्या होती. त्यांचा जन्म १९३७ रोजी सिमला येथे झाला.तेथे गेल्यानंतर त्यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामेटिक आर्ट्स या […]

भार्गवराम आचरेकर

अत्यंत बिकट परिस्थितीतही धीरोदात्तपणा न सोडणारे, निगर्वी, सरळ, प्रेमळ अंत:करणाचे मा.भार्गवराम आचरेकर यांना नाट्य व्यवसायातील चारुदत्त असे संबोधिले जात असे.त्यांचा जन्म १० जुलै १९१० रोजी झाला. स्थानिक शाळेच्या मदतीसाठी केलेल्या शारदा नाटकाच्या प्रयोगात त्यांनी वल्लरीचे काम इतके अप्रतिम केले की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यावेळी ललितकलादर्शचा मुक्काम मालवणला होता. बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. […]

1 365 366 367 368 369 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..