नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

मजरुह सुलतानपुरी

आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी सुलतानपूर उत्तर प्रदेश येथे झाला. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या […]

संगीतसमीक्षक,अभ्यासक व लेखक केशवराव भोळे

मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती होती. त्यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला. केशवराव भोळे यांचे वडीलही संगीताचे शौकीन होते. ते स्वतः सतारही वाजवीत असत. केशवरावांचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले. तथापि घरातील संगीतमय वातावरणामुळे केशवरावांना लहानपणापासूनच […]

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

तेजस्विनी पंडीत ही रणजित पंडित आणि जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या… तिचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला. तेजस्विनी पंडित ने ‘अग बाई अरेच्चा ‘ मधील निगेटिव्ह शेडमधील भूमिकेतून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर सुरु झालेला तिचा प्रवास जाहिरात, चित्रपट,मालिका,नाटक अशा चारही माध्यमात सुरु आहे. भूमिका ग्लॅमरस असो कि सोज्वळ त्या भूमिकेत शिरून त्यावर आपली छाप […]

मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला.  तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. […]

मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक संजय मोने

रक्त चरित्र या हिंदी चित्रपट तसेच पक पक पकाक या मराठी चित्रपटातून संजय मोने यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक कायमची आठवण ठाम केली. टाइम बरा वाईट, ‘पेइंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’ क्लासमेट्स, अ रेनी डे, मातीच्या चुली, रिंगा रिंगा आणि भो भो या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. याशिवाय रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्वेस्टमेंट’ या पुरस्कार विजेत्या […]

मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेते रवींद्र मंकणी

‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी झाला. रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘रवींद्र मंकणी’ यांची ‘स्वामी’ या मालिकेत ‘माधवराव पेशवे’ यांची भूमिका […]

जागतिक व्हिस्की दिवस

जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय […]

नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड

गिरीश कर्नाड म्हटलं की ‘तुघलक’ आणि ‘हयवदन’ ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, आपलं बहुतांश लेखन कन्नड मध्ये करणार्याव या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती आहे कोकणी. आणि प्राथमिक […]

गानहिरा हिराबाई बडोदेकर

ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फक्त माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी […]

विजय तेंडुलकर

प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुर येथे सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडिल कारकून होते. शिवाय प्रकाशनाचा छोटासा व्यवसायही ते चालवायचे. ज्या काळात मुलांना खेळण्याशिवाय इतर काही सुचत नसते अशा वयात अर्थात वयाच्या सहाव्या वर्षी तेंडुलकरांनी आपल्या लेखनास प्रारंभ केला. घरात विखुरलेली पुस्तके हे त्यांच्या लेखनाचे […]

1 344 345 346 347 348 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..