मराठी लेखक, कोशकार लक्ष्मण शास्त्री जोशी
लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: `मराठी विश्वकोषाचे शिल्पकार’ अशी असली, तरी ती ओळख अपुरी […]
