पहिल्या महिला कुलगुरू हंसा मेहता
पहिल्या महिला कुलगुरू हंसा मेहता यांचा जन्म ३ जुलै १८९७ रोजी गुजरात येथे झाला. हंसा मेहता या भारतातील एक समाजसुधारक, स्वतंत्र सेनानी, स्त्री-हक्काच्या पुरस्कर्त्या आणि शिक्षणतज्ञ होत्या. हंसा मेहता यांचे वडील मनुभाई मेहता हे बडोदा संस्थानचे दिवाण होते. त्यांचे आजोबा नंदशंकर मेहता हे गुजराती भाषेतील पहिले कादंबरी लेखक होते. हंसा मेहता यांनी इंग्लंडला जाऊन समाजशास्त्र आणि […]
