नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट

८६ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या […]

बंगाली भारतीय चित्रपट निर्माते आणि कथा लेखक ऋत्विक घटक

मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट ऋत्विक घटक यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला. ऋत्विक घटक यांचे वडील सुरेशचन्द्र घटक जिल्हा दंडाधिकारी आणि एक कवी आणि नाटककार होते. वडिलांच्या लिहिण्याचा प्रभाव त्यांच्या वर झालेला असावा. त्यांची आई इंदू बाला देवी, त्यांची बहिण प्रतिती आणि मोठा भाऊ मनीष घटक त्याच्या […]

हिंदी व तमिळ अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री

मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. […]

जागतिक टेलिव्हिजन दिवस

१९९६ च्या मार्च महिन्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात २१ नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिनाची साजरा करण्याची घोषणा झाली होती. या दिवशी विश्व दूरदर्शन सभा भरविण्यात आली होती. १९९६ साली दूरदर्शनचा ‘इडियट बॉक्स’ खेडोपाड्यात पोहोचला नव्हता व म्हणून प्रस्तुत दिनाची ‘‘श्रीमंतांचा दिवस’’ अशी हेटाळणी देखील झाली होती. […]

फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो

फुटबॉल मधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला. महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्डोहला सर्वश्रेष्ठय फुटबॉलपटू संबोधलेले आहे. रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्यांच्यापासून प्रेरीत होऊन त्यांरनी मुलाचे नाव‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’असे ठेवले होते.पुढे त्याूचे नाव‘ख्रिस्तियानो […]

सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन

अभिषेकचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. मुंबई, नवी दिल्ली, स्वित्झर्लंड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये […]

जेष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार बाबामहाराज सातारकर

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर […]

जेष्ठ लेखिका गिरिजा कीर

पूर्वाश्रमीच्या त्या रमा नारायणराव मुदवेडकर. मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळविल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ […]

ज्येष्ठ अभिनेते सुजित कुमार

सुजित कुमार यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी सिनेमांतून भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला. आराधना या हिंदी सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. सुजित कुमार यांनी छूटे राम, विदेशिया, दंगल, गंगा कहे पुकार के, गंगा जइसन भौजी हमार, सजनवा बैरी भइले हमार, हमार भौजी, माई के लाल, संपूर्ण तीर्थयात्रा अश्या लोकप्रिय भोजपुरी चित्रपटात कामे […]

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि संशोधक डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे

‘यादवकालीन मराठी भाषेचा भाषाशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९१४ रोजी झाला. पाच संतकवी, महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय, लीळाचरित्र, मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड – १, प्राचीन मराठी शब्दकोश, गुरुदेव रानडे – चरित्र व तत्त्वज्ञान, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे यांचे १० ऑगस्ट १९९४ रोजी निधन झाले. संजीव […]

1 223 224 225 226 227 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..