नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

थोर समाजसेवक बाबा आमटे

समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे. […]

गीतरामायणकार, महाकवी ग. दि. माडगूळकर

मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. […]

राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त

काव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणा-या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रकवी म्हणून गौरविले होते. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस ‘कवि दिवस’ म्हणून साजरा केला जातो. […]

गोल्डन व्हॉइसच्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले

नंतर १९६० चे दशक त्यांनी अक्षरशः गाजवले. “गोड गोजिरी लाज लाजरी‘, “परिकथेतील राजकुमारा‘, “मैनाराणी चतुर शहाणी…‘ ही कल्ले यांची गाणी चांगलीच गाजली. आधी देवांनी आणि नंतर अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली. […]

श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. […]

चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील

जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते. […]

माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा

माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९१८ भोपाळ येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध वैद्य होते. त्यांचे भोपाळ आणि आग्रा येथे सुरूवातीचे शिक्षण झाले. अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. आणि नंतर लखनौ विद्यापीठातून एल्एल् .एम्;. पुढे केंब्रिज विद्यापीठ आणि लिंकन्स इन (इंग्लंड) यांतून अनुक्रमे पीएच्. डी. व बार अँट लॉ या पदव्या मिळविल्या. […]

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग

रिकी पॉन्टिंग हा क्रिकेट जगताचा एक अद्भुत आणि महान ‘एंटरटेनर’ मानला जातो. रिकी पॉन्टिंगला क्रिकेट जगतात पंटर या टोपणनावाने ओळखले जात असे. […]

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे

भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे. […]

1 221 222 223 224 225 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..