नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग

विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला. […]

मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक भाऊ पाध्ये

भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता. पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत. […]

गोवा मुक्ती दिन

१९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली. […]

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर

शाहिद कपूरचा मुंबईत पंजाबी कुटुंबात जन्म झाला. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला.बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि अभिनेत्री व शास्त्रीय नर्तिका नीलिमा हे शाहिद कपूरचे आईवडील. शाहिदने लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पर्दापण केले होते. एक उत्कृष्ट अभिनेत्याशिवाय तो उत्तम डान्सरदेखील आहे. शाहिद ३ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले होते. यानंतर तो आपल्या आईसोबत दिल्लीत […]

एव्हरग्रीन व्हिलन डॅनी डेन्ग्झोपा

सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंस या जोरावर या खलनायकाने अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ रोजी सिक्किममध्ये झाला.अग्निपथचा कांचा चीना, मेरे अपनेमधला सडकछाप संजू, धुंदमधला अपंग तरीही क्रूर पती, हममधला बख्तावर, क्रांतीवीरचा चतुर सिंग चीता किंवा मग कातिया…या खलनायकाचे निर्दयी […]

काँग्रेसचे जेष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

विठ्ठलराव गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. मराठी राजकारणी आणि काँग्रेसपक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आणि राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते. विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य […]

जेष्ठ गीतकार एस.एच.बिहारी

एस.एच.बिहारी यांचे पूर्ण नाव शमशूल हुदा बिहारी. आपल्या या रोमँटिक गीतलेखनाने तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे एस. एच. बिहारी यांचा जन्म बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील अरा येथे. लहानपणापासूनच त्यांना भाषेचे प्रचंड वेड. त्या वेडातून त्यांनी हिंदी, उर्दू आणि बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळवले. पण भाषेइतकेच एस. एच. बिहारी यांना फुटबॉलचेही वेड होते. कोलकात्याच्या मोहन बगानकडून तरुणपणी […]

बिनाका गीतमाला

६६ वर्षापूर्वी ३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक आहेत. […]

मेरा नाम जोकर

मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. ‘ये दुनिया एक सर्कस है’, असं म्हणत राज कपूर यांनी भारतीय प्रेक्षकांना ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात सर्कस दाखवली. हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होता कि ज्याला दोन मध्यांतर होते. हा चित्रपट एकूण ४ तास ३० मिनिटांचा होता. […]

1 219 220 221 222 223 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..