बंगाली भारतीय चित्रपट निर्माते आणि कथा लेखक ऋत्विक घटक

मैलाचा दगड ठरणारे अनेक चित्रपट ऋत्विक घटक यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२५ रोजी ढाका येथे झाला. ऋत्विक घटक यांचे वडील सुरेशचन्द्र घटक जिल्हा दंडाधिकारी आणि एक कवी आणि नाटककार होते. वडिलांच्या लिहिण्याचा प्रभाव त्यांच्या वर झालेला असावा. त्यांची आई इंदू बाला देवी, त्यांची बहिण प्रतिती आणि मोठा भाऊ मनीष घटक त्याच्या वेळ मूलगामी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता. असा हा परिवार १९४७ साली बंगालच्या विभाजना नंतर भारतात कलकत्ता यथे आला. १९४८ साली घटक यांनी पहिल नाटक गडद तलाव लिहिले. १९५१ साली ते भारतीय पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) मध्ये झाले. त्यांचे शेवटचे नाटक १९७० सालचे ज्वाला. घटक चित्रपटात निर्मल घोष यांच्या सोबत सामील झाले,सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते साल होते १९५०. घटक यांचे पहिले व्यावसायिक प्रकाशन अजांत्रिक. यावरच काल्पनिक चित्रपट तयार केला. कथा लेखक म्हणून घटक यांना व्यावसायिक यश मधुमती (१९५८) या चित्रपटाने दिले. हा हिंदी चित्रपट होता याचे दिग्दर्शन बिमल रॉय यांनी केले होते. या चित्रपटाच्या कथेला अरजित फिल्म फ़ेअर सर्वोत्तम कथा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ह्रित्विक घटक यांनी पूर्ण लांबीचे आठ चित्रपट तयार केलेले आहेत यातील सर्वोत्तम चित्रपट म्हणजे मेघ ढाका तारा (१९६०),कोमल गांधार (१९६१),आणि शुब्रनरेका (१९६२).

ऋत्विक घटक हे सत्यजीत रे आणि मृणाल सेन यांचे समकालीन. ऋत्विक घटक प्रामुख्याने चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. तरी त्यांनी अनेक कथा आणि नाटक लिहिली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आठ पूर्ण लांबीचे वैशिष्ट पूर्ण चित्रपट आणि काही लघुपट,माहितीपट निर्माण केले. तसेच अनेक लघुकथा, नाटक आणि कविता लिहिल्या. ५० पेक्षा जास्त चित्रपटांवर लेख आणि निबंध लिहिले. ते फक्त चित्रपट दिग्दर्शक नव्हते तर त्यांच्या चित्रपटातली दृष आणि समालोचन विव्दातापूर्ण अभ्यास आणि शोधातून आलेल होत. त्यांना दोन देशातील विभाजनातून आलेला बंगाल मान्य नव्हता हीच धीम त्यांच्या जवळ जवळ सर्वच चित्रपटात अप्रत्यक्षपणे दिसत असे. चित्रपट बनवणे हि त्यांच्या साठी कला नव्हती,तर लोकांची दुखे आणि दुखांवर त्यांचा राग व्यक्त करण्याचे साधन होते. त्यांना १९७० साली भारत सरकारने पद्मश्री या किताबाने सन्मानित केले. ऋत्विक घटक काही काळ एफ टी आय आय चे संचालक होते.

एफ टी आय आय मध्ये शिकवत असताना त्यांच्या कडून मणी कौल,जॉन अब्राहम ,कुमार सानी आणि असे अनेक विद्यार्थी घडले. सत्यजित रे यांना जगभरातील प्रेक्षक लाभले,पण या बाबतीत घटक हे भाग्यवान नव्हते. ते जिवंत असताना त्यांच्या चित्रपटांना न प्रेक्षक लाभले ना त्यांची समीक्षा झाली. परंतु त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे चित्रपट भारतात आणि परदेशात फिल्म मेकींकच्या विद्यार्थीना आभ्यासासाठी ठेवले जातात. सत्यजित रे वास्तववादी सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत,परंतु रे यांच्या पथेर पांचाली या सिनेमाच्या तीन वर्षे आधी घटक यांनी नागरिक नावाचा वास्तविक सिनेमा तयार करून ठेवला होता. तो त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशित झाला. या नंतरच घटक यांचा प्रभाव भरत बाहेर पडू लागला. घटक यांचे अपूर्ण राहिलेले आणि प्रदर्शित होऊ न शकलेले अनेक चित्रपट आजही आहेत. हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संकलित करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

या प्रयत्नांना आता यश येत असून, पश्चि म बंगाल सरकारने घटक यांचे “काटो अजनारे’ (1959), “बनगार बगो दर्शन’ (1964) आणि “रंजर गुलाम’ (1968) हे प्रदर्शित होऊ न शकलेले चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केले आहेत.

घटक यांच्या अपुरे राहिलेल्या किंवा प्रदर्शित होऊ न शकलेल्या बहुतांश चित्रपटांच्या चित्रफितींचे संकलन आता चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध असणार आहेत. यात घटक यांचे 1959 ते 1971 या कालावधीतील चित्रपटांचा समावेश आहे, घटक यांच्या “तिताश एकती नदिर नाम’ (1973) या चित्रपटाची माहिती पुस्तिका, तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या “शहजादी मुमताज’ (1977) आणि बाबजीराव राणे दिग्दर्शित “संत तुकाराम’ (1932) या चित्रपटांची छायाचित्रे, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रदर्शित होऊ न शकलेला “जमानत’ हा चित्रपट आणि ज्योतिप्रसाद आगरवाल यांनी दिग्दर्शित केलेला पहिला आसामी चित्रपट “जोयमती’ (1935)ची छायाचित्रे आणि प्रेसक्लि पिंग उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शने यात घटक यांचे सिनेमे दाखवले जाऊ लागले आहेत. यानंतर त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाच्या मध्ये गणले जाऊ लगले. ऋत्विक घटक यांचे ६ फेब्रुवारी १९७६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/शंशाक बोरसेसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2156 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…