नवीन लेखन...

सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन

अभिषेकचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. मुंबई, नवी दिल्ली, स्वित्झर्लंड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अभिषेक बच्चनचे गुरु या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चन सोबत सुत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. आहे. अभिषेकला एक मोठी बहीण असून तिचे नाव श्वेता नंदा आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..