हिंदी व तमिळ अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री

शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्रीचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ झारखंड येथे झाला.

मीनाक्षी शेषाद्रीने हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मीनाक्षीने वयाच्या १७ व्या वर्षी १९८१ सालचा मिस इंडिया किताब जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती.

मीनाक्षी यांनी १९८२ साली पेंटर बाबू या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९८३ च्या सुभाष घई-दिग्दर्शित हीरो या चित्रपटाने त्यांना कीर्ती मिळवून दिली. दामिनी या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. मीनाक्षी एक सक्षम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. मीनाक्षीने बॉलिवूडमधील जवळपास प्रत्येक मोठ्या निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर काम केले आहे. अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर या बड्या स्टार्सबरोबर मीनाक्षी झळकली आहे. ‘जुर्म’ आणि ‘दामिनी’ या सिनेमांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते.

बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीच्या अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आता सिनेमाच्या या ग्लॅमर दुनियेपासून खूप दूर झाली आहे. सिनेमे करण्यामध्ये आता फरसा रस नसल्याचं तिने स्वत: स्पष्ट केले आहे. ‘घातक’ हा तिचा शेवटचा सिनेमा होता. मीनाक्षी व्यवसायाने बँकर असलेल्या हरीश मैसूरबरोबर विवाहबद्ध झाली. लग्नानंतर ती आपल्या पती आणि कुटुंबीयांबरोबर अमेरिकेतील टेक्सास शहरात स्थायिक झाली. मीनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेली मीनाक्षी तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2072 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

Loading…