नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

पार्श्वगायक मुकेश

ते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. […]

गोविंद तळवलकर

गोविंद तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल २८ वर्षे काम केले. […]

चंदू बोर्डे

१९६४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाचे आठ गडी बाद झालेले असताना बोर्डेंनी हिंमतीने किल्ला लढवला व अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी त्यांची बॅट गेली ती त्यांना परत मिळालीच नाही. […]

मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे

त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सर्वस्वी पेंटींगला वाहून घेतले. […]

अर्नेस्ट हेमिंग्वे

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. या यादवीत एका अमेरिकन क्रांतिकारकाला हौतात्म्य आले. त्यावर ‘फॉर हूम द बेल टोल्स’ ही कादंबरी लिहिली. लेखनाबरोबर बैलांच्या झुंजी, शिकार, प्रवास हे त्यांचे आवडते छंद. यासाठी वेळ काढून ते टांगानिकाला गेले. तेथील खेळांवर ‘डेथ इन द आफ्टरनून’, प्रवासवर्णनांवर ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ हे ग्रंथ लिहिले. […]

गायिका गंगूबाई हनगळ

१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी “गांधारी हनगल’ या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. […]

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

भारतीय एकात्मतेची पुष्टी करणारी विधायक अध्ययनदृष्टी, आंतरशाखीय अभ्यासपद्धती ही ढेरे यांच्या विचाराची, लेखनाची वैशिष्ट्ये होती. एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे त्यांनी सारे आयुष्य संशोधन, लेखन यांसाठी दिले. दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास हे त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय. ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथासाठी १९८७ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. […]

आषाढी एकादशी

आषाढ महिना म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती विठ्ठल रखुमाईची मुर्ती आणि पंढरपूरची वारी. तसंच विठ्ठल म्हटल्यावर कळत न कळत आपण गुणगुणू लागतो ती विठ्ठलाची गाणी. […]

सर एडमंड हिलरी

हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. […]

बँक ऑफ बडोदा

बँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली गेली. त्यानंतर मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसऱ्या महायुद्धानंतर. […]

1 180 181 182 183 184 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..