नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ अभिनेते डॉ.याकूब सईद

याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले. […]

अभिनेता हॅरिसन फोर्ड

इंडियाना जोन्स ऊर्फ इंडी ही भूमिका फक्त हॅरिसन फोर्डनेच करावी. इंडीमधल्या कमतरता, त्याचा अभ्यासूपणा, अतिधाडसीपणा हॅरिसन इतक्या ताकदीने रंगवतो की तो निव्वळ ही भूमिका करणारा अभिनेता राहत नाही. हॅरिसन फोर्डच्या धाडसाबाबत बोलायचं तर सिनेमातले स्टंट तो करतो. फक्त सिनेमातलेच नाही तर प्रत्यक्षात अचाट साहस करतो. विमानं उडवणं त्याला आवडतं. एकदा त्याच्या विमानाला अपघात झाला तेव्हा त्याची प्रतिक्रीया मजेशीर होती. त्याला विचारलं नेमकं काय झालं. तो म्हणतो, मी ते (विमान) मोडलं. […]

भारतीय कसोटी पंच स्वरूप किशन

भारतीय आणि परदेशी खेळाडूंना ‘लेग स्टंप गार्ड’ देण्याची त्यांची पद्धत औरच होती. भारतीयांना मान हलवून तर परदेशींना बोट वर करून ‘लेग’ देत. असे का, हे विचारताच भारतीयांना ‘जपून रहा’ तर इतरांस ‘बाद हो’ असे मनात म्हणायचो, असे ते सांगत. […]

बॉबी तल्यारखान

पारसी समाजाचे भारतीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर हे दोन कर्णधार भारताला दिले ते पारशानीच. अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान हे सुद्धा पारशी. मंगेश पाडगावकरांसारखा जाड चष्मा आणि दाढी असलेले हे एक महान समालोचक होते. बॉबी तल्यारखाननी एकदा तंत्रशुद्ध फलंदाज विजय़ मर्चंटची खिल्ली उडवली होती. […]

अभिनेते निळू फुले

वग असो, नाटक असो वा चित्रपट – स्वत:च्या खास शैलीने त्यांनी त्या त्या भूमिका अजरामर केल्या. केवळ चेहर्‍यांच्या संयत हालचाली, डोळे, पापण्या, ओठ, गाल अशा चेहर्‍यावरच्या सूक्ष्म हालचालींमधले संथ तरीही आशयसंपन्न फरक, त्यांच्या भूमिकेतून फार मोठा परिणाम साधत असे. सामाजिक समस्यांशी आणि त्यांच्या निराकरणासाठी झटणार्‍या निळू फुले यांना सामाजिक समस्यांना तोंड फोडणारी ‘सूर्यास्त’, ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’ यांसारखी मोजकी नाटके करायला मिळाली. पण त्यांनी सहजसुंदर अभिनयाने आणि अचूक निरीक्षणाने या नाटकातल्या भूमिकांना एका उंचीवर नेऊन ठेवले. […]

ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ

असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते. […]

ज्येष्ठ अभिनेते दारासिंग स्मृतिदिन

१०० हून अधिक चित्रपटांत दारा सिंग यांनी अभिनय केला होता. १९७८ साली दारासिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबाने गौरवण्यात आले होते. २००३ साली ते राज्यसभेचे खासदारही झाले. […]

जागतिक कागदी पिशवी दिवस

हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे. […]

पानशेत धरण फुटी

पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले. […]

ज्येष्ठ अभिनेते प्राण स्मृतिदिन.

त्यांना “यमला जट’ या पंजाबी सिनेमात अभिनय करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना उपकार, आँसू बन गये फूल, बेईमान या चित्रपटांमधील उत्कृष्ट भूमिकांबद्दल फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. याशिवाय अन्य अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. […]

1 182 183 184 185 186 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..