नवीन लेखन...

अभिनेता हॅरिसन फोर्ड

हॉलिवूड अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म १३ जुलै १९४२ रोजी शिकागो येथे झाला.

‘इंडियाना जोन्स’ म्हणून सिनेमात मारामाऱ्या करत धावपळ करणारा हॅरिसन फोर्ड ‘साठ साल का जवान’ का ते समजतं.. आजही त्याच्याकडे सिनेमांची कमतरता नाही. ‘इंडियाना जोन्स अ‍ॅण्ड द क्रिस्टल स्कल’मध्ये त्याचे स्टंट, त्याचा जोश पाहिला की अरे… यार अजून किती चपळ आहे हा म्हातारा, असं सहज म्हणून जातो आपण.एरव्ही प्रेसवाल्यांशी फटकून वागणारा, आपण कोणत्या धर्माला मानतो हे विचारताच ‘बॉर्न आयरिश, ज्युईश अ‍ॅज अ‍ॅक्टर’ अशी ओळख सांगून टाकतो. बावीस वर्षं तरुण कॅलिस्टा फोकहार्टबरोबर एंगेज असलो तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही… असं सांगणारा हॅरिसन फोर्ड आपल्याला त्याच्या आजूबाजूलाही फटकू देत नाही.

हॅरिसन फोर्ड यांची आई रेडिओ अभिनेत्री डोरो निडेलमन आणि वडील जाहिरात व्यवस्थापक व अभिनेते क्रिस्तोफर फोर्ड यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला. १९६० मध्ये हॅरिसन यांनी इलिनॉय पार्क येथील मेन ईस्ट हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. शिक्षणादरम्यान डब्ल्यूयुएमएमएच या रेडिओ स्टेशनवर त्याचा आवाज प्रथमच प्रसारित झाला. १९५९ – १९६० दरम्यान या रेडिओ स्टेशनवरुन हॅरिसन यांनी कार्यक्रम प्रसारित केले. त्यानंतरच्या शिक्षणासाठी त्यांनी रिपोन कॉलेजमध्ये प्रवेश केला. इथेच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली.

१९६४ मध्ये लॉस एंजलिस येथे गेल्यानंतर सुरुवातीला त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. हक्काशचे म्हणून रेडिओ स्टेशनला अर्ज दिला पण तो सुध्दा नाकारण्यात आला. अखेरीस कोलंबिया पिक्चर्ससोबत नवीन कलावंत म्हणून १५० डॉलर प्रति आठवडा या मानधनावर करार केला. या नवीन कलावंतांना चित्रपटातील समूह दृष्यात वेगवेगळी कामे मिळत असत. या छोट्या भूमिकांमध्ये त्यांची ओळख म्हणून पहिला चित्रपट सांगता येतो तो म्हणजे मेरी गो राऊंड (१९६६) यातील त्यांच्या संवादविरहीत असलेल्या नोकराची भूमिका लक्षणीय ठरली.

त्यानंतर छोट्या छोट्या भूमिकातून हॅरिसन फोर्ड म्हणून नाव प्रसिध्द होण्याची संधी मिळाली. ए टाइम फॉर किलिंग (१९६७) या चित्रपटात. १९७० च्या सुरुवातीला त्यांनी गन्मस्मॉक, इरॉन्साइड, द व्हर्जिनियन, द एफबीआय, लव अमेरिकन स्टाइल आमि कुंक फू सहित अनेक मालिकांमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओसाठी छोट्या भूमिका केल्यात. त्यादरम्यान वेस्टर्न जर्नी टू शिलॉह (१९६८) आणि माइकल एजंलो यांच्या जैब्रिस्की पॉइंट या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली. पण यातून उत्पन्न फारसे मिळत नव्हते अखेरीस पत्नी व दोन मुलांचा संसार सांभाळण्यासाठी त्यांनी सुतारकाम सुरु केले. त्यांना सुतारकामा साठी देखील चित्रपटासंबंधीच कामे मिळाली. चांगलं सुतारकाम करणारा हॅरिसन सिनेमासाठी सेट बनवायचा. सुतार काम करीत असतांना त्यांची ओळख जॉर्ज लुकास याच्याशी झाली. त्यांनी त्यांच्या घरातील कपाटे बनविण्यासाठी हॅरिसन यांना कामावर ठेवले होते. त्यांनी, हे लाकूडकाम सोडून जरा अभिनय ट्राय कर, असा सल्ला दिला. अर्थात तो सल्ला त्याने मानला म्हणून बरं झालं. नाही तर हा बसला असता सेलेब्रिटीजच्या घरातले फनिर्चर बनवत. याच ओळखीतून त्यांची गॉडफादरचे दिग्दर्शक फ्रासिस कपोला यांच्याशी ओळख झाली. त्यांच्या कार्यालयाच्या विस्तारीकरणाचे काम हॅरिसनला मिळाले. गॉडफादर यशस्वी ठरल्यानंतर या ओळखीतून हॅरिसन यांना फ्रासिस यांच्या द कन्वर्सेशन (१९७४) आणि एपोकॅलिप्स नाऊ (१९७९) या चित्रपटात छोट्या भूमिका मिळाल्यात.

सेट बनवताना जॉर्ज ल्युकासशी झालेली ओळख त्याला फायद्याची ठरली. ‘स्टार वॉर्स’मध्ये भूमिका मिळण्यासाठी ही दोस्तीच कामी आली. स्टार वॉर्सने एक स्टार जन्माला घातला, तो हॅरिसनच्या रूपाने. स्टीव्हन स्पिलबर्गशी दोस्ताना झाला त्याच सिनेमाच्या सेटवर. पुढे इंडियाना जोन्सची अजरामर भूमिका करण्यासाठी स्टीव्हनने त्याची निवड केली.

रॉजर मूर, शॉन कॉनरी, पिअर्स ब्रॉसनन आणि आताच डॅनिअल क्रेग म्हटलं की लक्षात येतं की ते ‘बॉण्ड’ आहेत. सुपरमॅन म्हटलं की ख्रिस्तोफर रिव्ह्ज, ‘मॅॅट्रीक्स’ उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो कियानू रिव्ह्ज. एका अजरामर भूमिकेमुळे अनेक अभिनेते ओळखले जातात. पण हॅरिसन फोर्ड इतका लकी की त्याला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवून दिली ती ‘स्टार वॉर्स’मधील हॅन सोलोने. पण इंडियाना जोन्स ही भूमिका त्याच्याशिवाय कोणी करावी कल्पनाही करवत नाही. अगदी दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्गलाही.

त्यानंतर मात्र त्यांच्याकडे चित्रपटाची रांग लागली. यात हिरोज, फोर्स 10 फ्रॉम नॅवारोन, हॅनोवर स्ट्रीट, द फ्रिस्को किड, ब्लेड रनर, विटनेस, द मॉस्क्विटो ओन, फ्रैटिक हे चित्रपट गाजले. १९९० च्या दशकात हॅरिसन यांचा सुवर्णकाळ ठरणारे चित्रपट आले. त्यात प्रामुख्याने इनोसंट, पेट्रियट गेम्स, द फ्युझिटिव, क्लिळअर अॅटण्ड प्रेझेंट डेंजर, द डेविल्स ओन, सबरीना, एअर फोर्स 1, द हंट ऑफ रेड ऑक्टोबर, सिक्स डेज, सेव्हन नाइटस्, रॅडम हार्टस्. यातील एअर फोर्स 1 मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची भूमिका जगभरात गाजली.

हॅरिसनला गॅरी कूपर आणि ग्रेगरी पेक आवडतो. वयाला साजेशी अशी त्याची आवड आहे. पण तरीही सिनेमात काम करताना तो कधी ओल्डफॅश्नड वाटत नाही. तो देखणा किंवा संवेदनक्षम अभिनेता नाही. पण पब्लिकला थिएटरपर्यंत खेचून आणण्याची ताकद त्याच्यात आहे. भरपूर पैसा कमवला पण ऑस्कर मात्र त्याला एकदा मिळालं ते ‘विटनेस’ सिनेमासाठी. २००० च्या दशकात बट लाइज बिनीथ के 19, हॉलिवूड होमिसाइड, फायरवॉल हे चित्रपट आले.

यातील केवळ बट लाइज बिनीथ या चित्रपटाने जगभरात ३०० मिलियन डॉलर कमावले. २००४ मध्ये फोर्ड यांना सिरियाना हा चित्रपट मिळाला होता पण त्याची कथा सशक्तड न वाटल्याने त्यांनी तो नाकारला. नंतर ती भूमिका जॉर्ज क्लू नी यांनी केली व त्यासाठी त्यांना ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब अ‍ॅवार्ड मिळाले. हा चित्रपट नाकारल्याचा सल अजूनही हॅरिसन यांना आहे. २००८ मध्ये जॉर्ज लुकास आणि स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी संयुक्तलरित्या केलेल्या इंडियाना जोन्स अ‍ॅण्ड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल या चित्रपटाने त्यांना 2000 च्या दशकातील पहिली यशाची चव चाखायला मिळाली. २००८ मध्ये या चित्रपटाने जगातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट म्हणून मान मिळविला. २००८ मध्ये त्यांचा क्रॉसिंग ओवर हा ही एक चित्रपट आला.

सध्या फोर्ड कंजरव्हेशन इंटरनॅशनल ह्या पर्यावरणसंबंधी कार्य करण्यार्या८ संस्थेच्या संचालक मंडळात आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल यांना द जुल्स वर्न स्पिरीट ऑफ नेचर अॅ०वार्डदेखील मिळाला आहे. त्यांच्या कार्याबद्दल 1993 मध्ये नॉर्मन प्लाटिक यांनी शोधलेल्या कोळ्याच्या नवीन प्रजातीला कैल्पोनिया हॅरिसनफोर्डी आणि 2002 मध्ये कीटकसंशोधक एडवर्ड ओ विल्सन यांनी शोधलेल्या मुंग्याच्या नव्या प्रजातीला फीडोल हॅरिसनफोर्डी असे नाव देण्यात आले आहे.

इंडियाना जोन्स ऊर्फ इंडी ही भूमिका फक्त हॅरिसन फोर्डनेच करावी. इंडीमधल्या कमतरता, त्याचा अभ्यासूपणा, अतिधाडसीपणा हॅरिसन इतक्या ताकदीने रंगवतो की तो निव्वळ ही भूमिका करणारा अभिनेता राहत नाही. हॅरिसन फोर्डच्या धाडसाबाबत बोलायचं तर सिनेमातले स्टंट तो करतो. फक्त सिनेमातलेच नाही तर प्रत्यक्षात अचाट साहस करतो. विमानं उडवणं त्याला आवडतं. एकदा त्याच्या विमानाला अपघात झाला तेव्हा त्याची प्रतिक्रीया मजेशीर होती. त्याला विचारलं नेमकं काय झालं. तो म्हणतो, मी ते (विमान) मोडलं.

विमानांची आवड असल्याने, आजच्या घडीला त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची 11 विमाने आहेत. ही सर्व विमाने फोर्ड सॅन्टा मोनिका विमानतळावर ठेवतात. 2009 मध्ये फोर्ड जनरल एव्हिएशन सव्ह अमेरिका यांच्या काही जाहिरातींमध्ये दिसले. विंग्ज ऑफ होप या संस्थेचे ते मानद सदस्य आहेत. 2010 मध्ये आलेल्या एस्ट्र ऑर्डिनरी मेजर्समधील डॉ.रॉबर्ट स्टोनहिल आणि मॉर्निंग ग्लोरीमधील माइक या भूमिकांनी फोर्ड आजच्या पिढीतील तरुणांचाही आवडता अभिनेता आहे.

संजीव वेलणकर.

९३२२४०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..