नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

माझी कोकणची सहल – कोकणचं ‘जरा हटके’ रुपडं

गेल्या महिन्यात दोन-तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरायला गेला होतो. सिंधुदुर्गातले समुद्रकिनारे नितांत सुदर असले तरी यावेळी कोकणचं थोडं वेगळ आणि रांगड स्वरूप अनुभवायचं म्हणून समुद्र किनारे आणि गर्दीची ठिकाण मुद्दामहून टाळली होती. यासाठी आम्ही निवड केली होती कणकवली नजिकच्या हरकुळ खुर्द व कुडाळ जवळच्या पावशी गावाची.. मुंबईहून मी, राजेश जाधव, विनय कदम व महेश चाफेकर असे आम्ही […]

मन की बात – विश्वास

गेले काही दिवस माझ्या मनात ‘विश्वास’ या विषयावर विचार येत होते. खरच विश्वास ठेवावा का कोणावर? कि ठेवूच नये? एखाद्यासाठी आपण जीवाला जीव द्यायला तयार होतो तो विश्वासानेच कि आपल्यावर तशी वेळ आली कि ‘तो एखादा’ तसेच वागेल या अपेक्षेने..? अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात गुंता झला होता..असे प्रश्न निर्माण होण्याला माझ्या काही जवळच्यांची प्रत्यक्ष पाहिलेली तशीच […]

नविन वर्षाच्या पहिल्या सकाळचं गुड माॅर्निंग

नविन वर्षाच्या पहिल्या सकाळचं गुड माॅर्निंग.. नविन वर्षात आपल्या शरीराला गुदगुल्या करणारं, काहीतरी हवंहवंसं वाटणारं रोज घडो. त्याचसाठी तर आपण धडपडत असतो..परंतू त्याच बरोबर मनाच्या माध्यामातून मेंदूला गुदगुल्या करणारं, विचार करण्यास भाग पाडणारं, सदसदविवेकबुद्धी जागृत करणारंही काहीतरी घडो ह्या शुभेच्छा..!! – नितीन साळुंखे

अलविदा २०१६..!!

वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. […]

अलविदा २०१६..!!

“आहीस्ता चल जीन्दगी, अभी कर्ज चुकाना बाकी है..! कुछ दर्द मिटाना बाकी है, कुछ फर्ज्ञ निभाना बाकी है..!” आज इसवी सन २०१६ चा शेवटचा दिवस.. वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय.. एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून धडपड करून ती मिळवावी तोच आयुष्य सर्रकन […]

मन कि बात – नवीन वर्ष

उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही..पण होतं काय की, गोड आठवणी आपण चटकन विसरतो आणि कटुता मात्र हृदयाशी कवटाळून ठेवतो..व ह्या कडू […]

शिवी; एक अत्यावश्यक मानसिक गरज..

आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या […]

बाबासाहेब… फक्त एका समाजाचे

आज इतक्या वर्षांनंतर डाॅ. बाबासाहेब तळागाळात पोहोचले, रुजले. परंतू शेवटी जे सर्वच मोठ्या माणसांचं होतं तेच बाबासाहेब या देव माणसाचंही झालं..बाबासाहेब एक समाजाचे म्हणून ओळखले जायला लागले. जसं, संत नामदेव शिंपी समाजाचे झाले, संत रोहीदास चर्मकार समाजाचे, फुले माळीसमाजाला दिले गेले..! अशी कित्येक उदाहरणं देता येतील. परदेशात असं झालेलं दिसत नाही. मार्टीन ल्युथर किंग किंवा नेल्सन […]

टिनेजर (TEENAGER)

रोजचा दिवस काहीतरी शिकवून जातोच. असंच कालच्या दिवशी मला इंग्रजी TEENAGER या शब्दाचा उगम कळला व कालचा अवघा दिवस सार्थकी लागला.. साधारणत: वय वर्ष १२ ते २० वयापर्यंतच्या मुला/मुलींना TEENAGER म्हणतात हे सवयीने ऐकून माहीत होतं, पण का म्हणतात हा विचारच कधी मनात आला नव्हता. कालचा दिवस संपता संपता ध्यानी मनी नसता हा शब्द अचानक उलगडला […]

टॅक्सीवाल्याची शिकवण – मन की बात..

केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. मन की बात.. ‘टॅक्सीवाल्याची शिकवण’ ही माझा लेख ‘दैनिक सकाळ’, पुणे व नगर आवृत्तीत ‘मुक्तपिठ’या सदरात नुकताच प्रसिद्ध […]

1 25 26 27 28 29 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..