नवीन लेखन...
Avatar
About प्रकाश तांबे
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

डेंग्यी आणि मलेरीया स्पेशालिस्ट

वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले. […]

‘स्वबळावर’….

देशभरातील राजकारणी रोजच्या रोज पुनरोच्चार करत असलेल्या “स्वबळावर” या संज्ञेचा मी किचनमधे वापर करुन स्वबळावर दोघांसाठी उप्पिठ करायचा घाट घातला आणि घात झाला. कीचनमधील कारकीर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात ” जेवणाशिवाय किचनमधे फिरकू नका ” अशी तंबी मिळाली. […]

पोपट पोपटीण आणि जोशीकाका

पुण्याच्या सदाशिवात आमच्या जुन्या घराजवळच्या डेरेदार वृक्षावरच्या ढोलीत पोपट आणि पोपटीणीनी संसार थाटला होता. दिवसभर ढोलीत येणा-या जाणा-यांचा राबता असायचा; जॉइंट फँमिली असावी कदाचित किंवा समाज कल्याणासाठी पोपट दांपत्यानी हिरव्या मिरच्यांचा मोठ्ठा साठा करुन ठेवला असेल येणार्‍या जाणार्‍यांसाठी आणि तेही नसेल तर मात्र पोपटीण दिसायला सुंदर असणार हे नक्की. […]

उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने

गणपती जेमतेम ६-७ आठवड्यांवर आलेत; उकडीच्या मोदकाविषयी कोणी काहीच न लिहिण योग्य दिसत नाही. ते खरोखर तोंडात पडण्यापूर्वी निदान थोडी वातावरण निर्माण करण गरजेच वाटतय. […]

युरोपायण – पहिला दिवस

मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला. […]

भक्तीरसाने ओथंबलेली नवी गाणी (विनोदी लेख)

भक्तीरसाने ओथंबलेल्या या गाण्यांच्या भक्तीमय वातावरणात गणोशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती व इतर सणांच्या काळात विविध चित्रपटांची गाणी वाजवली जातात… त्याचा अनेकांना त्रास होतो….! खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो… ही गाणी समजावी व आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न…. […]

पोळी ते फोडणीची पोळी

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत फोडणीची पोळी तिच्या शिळेपणामुळे नैवेद्यासाठी जरी निषिध्द मानली गेली असली तरी ती खवैयाच्या जिभेवर मात्र पहिल्या पंगतित विराजमान असते. तिचे जीवन तर मानवीजीवनासाठी आदर्श वस्तूपाठच असते. […]

डोळा

डोळा ह्या अवयवाकडे आपण जरा डोळसपणे बघायलाच हव. काणा डोळा करण्या सारखा तो अवयव नाही. असतात दोन, पण एकमेकांकडे न बघता एकेच ठिकाणी एकाच वेळी बघतात. मोठे केले की भिती, विस्फारले की आश्चर्य, मिचकावले की खोट खोट आणि एकच मारला की मार खायची लक्षण! कधी काळे, कधी पिंगट, कधी घारे व कधी कधी राजकपूरसारखे निळे. […]

माझी पहिली चित्रपट कथा

रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ’ पद्धतीनी काढली गेली असावी! […]

नऊवारी एअर होस्टेस

बाईंनी माईकवर जाहीर केल “सर्व अलौंन्समेंट म्हराटित होतील तवा समद्यांनी हित ध्यान द्यायाचय. पुन्ह्यांदा सांगन होनार न्हाई. डोईवरच प्यँनल घट लावा नाहीतर तुमच्या बँगा खाली घरंगळतील आनी कुनाची पन टकुर फुटतील. ” माझ्या प्रमाणे ईतरही उठले आणि भितीपोटी पँनल घट्ट बंद असल्याची खात्री करुन घेतली. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..