उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने

गणपती जेमतेम ६-७ आठवड्यांवर आलेत; उकडीच्या मोदकाविषयी कोणी काहीच न लिहिण योग्य दिसत नाही. ते खरोखर तोंडात पडण्यापूर्वी निदान थोडी वातावरण निर्माण करण गरजेच वाटतय.

चव आणि आकाराबाबत खर्या अर्थाने सौंदर्य ओसंडुन वाहणारा हा पदार्थ खवैयांच्या जिभेला आणि डोळ्यांना तृप्त करुन सोडतो. तो खाण्या इतकाच तो होताना किंवा झालेला बघण हा ही एक आनंददायी सोहळा असतो.

मळून मऊ झालेल्या उकडीमधे सारण भरल जाण्यापूर्वी त्याची चव घेउन गोडी ठरवणे हा छंद मी लहान पणापासुन जोपासलाय. ह्या चव बघाण्याच्या निमित्ताने दोन-चार राउंड झाल्याशिवाय माझ्याकडुन सारण कधीच Ok झालेल नाही.

तांदुळाच्या पिठाच्या पारीमधे हे गुळखोबर्याच सारण भरुन टम्म फुगलेल्या ऐवजाला नजाकतीने नाक काढुन त्या सुबक नाकाला काही गृहिणी केशराच बोट लाउन अधीकच आकर्शित करतात. कोकणात, म्हणजे उकडीच्या मोदकांच्या माहेरी, ही प्रथा असेलच; मी दिवेआगरला बापट-केळकर आदींच्या घरी ते अनुभवलय.

काही घरी मोदकांच्या गर्दीत छोटीशी जागा शोधुन एखादी करंजीही बसवतात. अजुन एक गोष्ट म्हणजे मोदकाबरोबर निविगऱ्याही केल्या जातात ज्या खाताना मोजदाद ठेवायची नसते.

शिजलेले मोदक उकडीतुन बाहेर काढण हे अत्यंत नाजुक काम आहे. टाके मारलेल्या तांब्याच्या मोदकपात्रात वा चाळणीत केळीच्या पानावर मांडलेले टम्म फुगुन बैठक मारलेले एकसारख्या आकाराचे मोदक ही डोळ्यांसाठी अँन्युअल ट्रीट असते.

तेल लाउन आलेल्या तुकतुकीतपणामुळे प्रत्येक मोदक हा तेल लाउन न्हाउ घातलेल्या गोंडस बालकासारखा दिसतो. मोदकांच्या त्या गर्दित, सारण बाहेर येउ पाहणारे मोदक बघवत नाहीत म्हणुनच नैवेद्यापूर्वी ते बाजुला काढुन ठेउन माझ्यासारख्या गरजुंंना जेवताना अग्रक्रमाने वाढले जातात.

जेवताना नाईलाजास्तव मोदकाच्या नाकाला उकलाव लागत कारण त्याशीवाय पातळ तुपाची धार त्याच्या “बैठकीपर्यंत” पोहोचत नाही.
हे सर्व व्यवस्थित पार पडल्यावर गुलाबजांब पकडतो तसा पकडुन एकेक मोदक तोंडात सरकवावा. काही भावीक हे कार्य दोनच्या पटीत जेवण होईपर्यत चालु ठेवतात. चवीतील बदलासाठी अधुन मधुन निविगऱ्या घ्याव्यात. त्या दह्याबरोबर छान लागतात.

मोदक घरच्या सुग्रणीनेच करावे कारण खवैयांची भरपूर मोठी बाजारपेठ निर्माण झालेल्या उकडीच्या मोदकाचे भाव मूर्तीच बोट धरून मूर्तीप्ररमाणेच दरवर्षी १५-२० टक्यांंनी वाढतायत.

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 26 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…