नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

शीतल नावाचं अशांत वादळ – गौतम करजगी !

बाबा आमटे या दैदिप्यमान सूर्यप्रतापी व्यक्तीची ही नात ! आजोबांनी कुष्ठरोग्यांना जीवन पुनर्बहाल केलं आणि नातीने मागील वर्षी स्वतःचे जीवन संपविले. काही काळ “यूथ आयकॉन” शीतलबद्दल समाज माध्यमांवर फैरी झडल्या. नंतर “पब्लिक मेमरी ” शॉर्ट नांवाखाली सारं शांत ! ही निखाऱ्यावर जमलेली काजळी तिच्या पतीने (गौतम करजगी यांनी) “अक्षर ” या दिवाळी अंकात वरील शीर्षकाचा लेख लिहून झाडली आहे. विसरलेली खपली संयतपणे उचकटून काढली आहे. शेवटी हे नातं असं आहे की लेखन अस्सल (ऑथेन्टिक) वाटतं. […]

‘गौरी देशपांडे’ – WAS ?

…. आणि हे आडनांव ज्येष्ठ भगिनीचे वादळ मला गिरकावून गेलं. तिची यच्चयावत पुस्तके (अगदी शेवटचे “विंचुर्णीचे धडे”) मिळवून/विकत घेऊन वाचली आणि संग्रही ठेवली. “एकेक पान गळावया” हरवलं तर नवं घेतलं. […]

बाबासाहेब उपाख्य बमो….

मी पाहताक्षणी त्यांना ओळखले- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! पुढे आलेल्या व्यक्तीजवळ एक पिशवी होती आणि तिने अजीजीने सर्वांना विनंती करायला सुरुवात केली – ” अहो, यांना ओळखलं कां ? हे बाबासाहेब पुरंदरे ! पुण्याला निघाले आहेत. कृपया त्यांना बसायला जागा देता कां ?” […]

‘घर’ थकलेले संन्यासी !

यंदाच्या दिवाळीची सुरुवात ३१ ऑक्टोबरला परिमल राजहंसच्या मैफिलीने झाली आणि दिवाळीचा माहोल १३ नोव्हेंबरच्या “मागे उभा मंगेश” या शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या मैफिलीने संपुष्टात आला. […]

‘मीरा’ – उपेक्षित नाममुद्रेची उपेक्षा !

ऐतिहासिक पुराव्यां अभावी एक सर्वमान्य निष्कर्ष असा आहे की – मीरा कृष्णभक्त होती , तिने कृष्णभक्तीपर रचना केल्या (ज्या कधींच्याच अक्षर वाङ्मयांत सामील झालेल्या आहेत) आणि ती नि:संशय भक्ती संप्रदायातील एक महत्वाची संत कवयित्रीं होती. गुलजारसारख्या अंतर्बाह्य कवीला यापेक्षा अधिक काय हवे? […]

‘हुतूतू’- जगणे विकणे आहे !

गुलजारच्या चित्रपटांची नावे विचारात टाकतात. कथावास्तूशी असणारा त्यांचा संबंध जोडणे इतके सोपे नसते. “हुतूतू ” पाहायला मी पुण्याच्या सोनमर्ग चित्रपटगृहात दुपारी गेलो तेव्हा याच विचारात होतो. बघायला सुरुवात केल्यावर नेहेमीप्रमाणे गुंगून गेलो. […]

‘वेदना’ किंग- मेहदी हसन !

गुलाम किंवा जगजीत चा रुबाब मेहदी हसन च्या चेहेऱ्यावर नव्हता. आयुष्याने दिलेले सगळे घाव, जगलेले संघर्ष त्याच्या ओबड-धोबड सच्च्या चेहेऱ्यावर होते. पहिल्यांदा त्याचा गझल कार्यक्रम पाहिला/ऐकला तेव्हा हे सगळं सोसणं बाळगत विनातक्रार तो बांधिलकीने गात होता. मैफिली गणिक एखादे नवे कडवे तो “रंजीस ही सही ” मध्ये गुंफत होता आणि आम्ही वेडावत होतो. […]

‘आज सोचा तो…..’ – वाताहतीचे अर्काइव्ह !

“आत” मध्ये कोलाहल सतत सुरु असतात. दरवेळी नव्या सूर्याच्या स्वागताला बाहेरच्या अंगणात जाणं जमतंच असं नाही. तो सूर्यही तसा झाकोळलेलाच असतो. मागच्या परसदारातील किंचित काळोख्या तुळशीवृंदावनापाशी तिचा संयत सूर सापडतो. काल-परवा घडून गेलेल्या, पुसट न झालेल्या काळाच्या गोधड्या पुकारत असतात आणि त्यांच्या घट्ट उबेत बरंच काही पुनःपुन्हा साचत असतं, सापडतही असतं. […]

‘परिचय’ – नात्यांची नव्याने ओळख !

एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो. […]

‘कोशिश’ – शब्देविणू संवादू !

“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे. […]

1 21 22 23 24 25 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..