नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

‘दो अंजाने’ – फरफटीची दास्तान !

हा चित्रपट दस्तुरखुद्द अमिताभ आणि रेखाच्याही स्मरणात असणे तसे अवघड ! त्यांच्या कोठल्याही चार्टबस्टर / अमुक-तमुक कोटी घराण्यातील नाही. प्रेक्षकांचा फारसा प्रतिसादही नसलेला ! […]

अभिजात शब्दाच्या पल्याड – आमटे कुटुंबीय !

माझ्या भावाने बाबा आमटेंच्या काव्यसंग्रह प्रकाशन समारंभातून त्यांचे पुस्तक (“ज्वाला आणि फुले” ) विकत आणले आणि आमटे कुटुंबाचा आमच्या घरात प्रवेश झाला. त्यांच्या ज्वालाग्राही शब्दांनी झडझडून जाग आणली. तेव्हापासून मनात त्यांना भेटण्याची इच्छा मनात होती. खूप उशीरा ती फलद्रूप झाली. […]

‘नटसम्राट’ – डॉ. लागू

कुसुमाग्रजांचे शब्द लागूंच्या वाणीतून कृतार्थ झाले. त्यांच्यानंतर दत्ता भट /यशवंत दत्त यांनी साकार केलेले नटसम्राटही मला भावून गेले. पण लागूंचे interpretation आणि सादरीकरण केवळ ! त्यांच्या “लमाण” ने थरारून सोडले. Athlete/Philosopher ही स्वतःबद्दलची ओळख किती वेगळी ! “मी तो हमाल भारवाही” ही विनम्र भूमिका मांडणारा आणि अखेरपर्यंत जगणारा हा कलावंत ! […]

पद्मश्री लीला पूनावाला !

त्यांची आणि माझी प्रथम भेट नक्की कुठे झाली आठवत नाही. बहुधा पुण्यातील एखाद्या HR कार्यक्रमात झाली असावी. visiting cards ची देवाण -घेवाण झाली. माझ्या सवयीनुसार त्यांच्या कार्डमागे तारीख /वेळ /प्रसंग वगैरे मी लिहिले. स्मृती लख्ख राहाव्यात आणि भविष्यकालीन संदर्भासाठी नोंद असावी म्हणून माझा मित्र रविशंकरने मला ही सवय लावली आहे. […]

अभिजात “आशा “

हृदयनाथ आणि लता मंगेशकरांबद्दल लिहिल्यावर आशा भोसलेंवर लिहिणे आलेच. त्याही पूर्वाश्रमीच्या मंगेशकर – त्यामुळे अभिजात या शिक्क्यावर त्यांचाही तितकाच हक्क ! […]

नृत्य आणि नर्तिका !

चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत. मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी ! […]

अरे पुन्हा….. !

हृदयनाथांनी सुरेश भटांची ” उषःकाल होता होता ” ही संगीतबद्ध केलेली गझल भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावरचा जळजळीत ओरखडा आहे. आणि “अरे पुन्हा ” ची पाळी यावी हेही तितकेच दुर्दैवी नाही का? या गीतामधील लताचे आवाहन मोठे की प्रत्येक ओळीच्या पार्श्वभूमीवरील पडद्यावरचे विषण्ण वास्तव मोठे हे मला ठरविणे अजूनही जमत नाही – फक्त चटके मात्र बसत असतात. […]

अभिजात “लता” !

खरं तर तिला कोठल्याही विशेषणाची/ उपनामाची गरज नाही. विशेषतः भालजी पेंढारकरांसारख्या तपस्व्याने तिचे “भगवान श्रीकृष्णाची हरवलेली बासरी ‘असे केलेले समर्पक वर्णन वाचल्यावर मी तोकडा पडतो. ती स्वयंभू आहे. […]

निळू भाऊ – उत्तर द्याल !

आमच्या प्राचार्यांना (जोगळेकरांना ) वाटले -निळूभाऊंना महाविद्यालयात बोलवावे. त्यांनी सुचविले -एखादा कार्यक्रम ठेवा. नुक्तेच महाविद्यालयात एक रक्तदान शिबीर झाले होते. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण निळूभाऊंच्या हस्ते रक्तदात्यांना करावे अशी रूपरेषा ठरली. […]

काळाचा पांढरा हात !

नेहेमीचा शौनक अभिषेकींचा खर्ज /शास्त्रीय आवाज येथे अधिक मऊ / हळुवार आणि भावगीत सुलभ वाटतोय. त्यामानाने राहुलचा थोडा कठोर/ टणक वाटतोय.(” किंचित हार्श” ला हा शब्दपर्याय जवळचा वाटतो कां?) […]

1 19 20 21 22 23 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..