नवीन लेखन...
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

वालचंद (चेही) आर्टस् सर्कल !

मिरज मेडिकल आणि बी जे मेडिकल च्या आर्टस् सर्कल बद्दल बरेच ऐकिवात होते. मग आपणही वालचंदला आर्टस् सर्कल कां काढू नये या विचाराने आम्ही काही काळ वेढलेलो होतो. अनेक गुणी विद्यार्थी त्याहीकाळी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये असत. अशांना एखादे कायमचे आणि सततचे व्यासपीठ असावे असे आम्हाला वाटले. […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – २

विद्यार्थी धावताहेत आय आय टी च्या स्वप्नामागे ! त्यासाठी पालक आर्थिक ताण (पोटाला चिमटा वगैरे) आणि तरुण शारीरिक/मानसिक खच्चीकरणाच्या मागे धावताहेत. मुलांना बरं वाटत नाही आणि ते क्लासला येत नाही हे कळल्यावर “कोटा फॅक्टरीचा ” शिक्षक म्हणतो – ” आजारी पडण्याची चैन तुम्हाला परवडणार नाही. ” […]

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – १

कोटा फॅक्टरी IIT बद्दल हेच अंजन आपल्या डोळ्यांमध्ये घालण्यात यशस्वी होते – फरक असला तर तो इतकाच की सनदी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या या परीक्षेपेक्षा IIT साठी प्रयत्न करणारे विद्यार्थी उच्च शिक्षणाची स्वप्ने बघत आपले तारुण्य पणाला लावत असताना याहून अधिक तणावांना कदाचित (खरे तर नक्कीच )सामोरे जात असतील, बाकी आकडेवारी समांतर आहे. […]

विश्वव्यापी परिपूर्णता

अम्मांच्या अमृतमिठीत सामावण्याचे भाग्य ज्यांना लाभलंय ( मी सुदैवी- आजतागायत त्यांनी मला ९-१० वेळा कुशीत घेतलंय. माझी पत्नी त्याहून भाग्यवान – तिने तर अम्मांचे मराठीतील पहिले चरित्र लिहिलंय, जे खुद्द अम्मांच्या हस्ते पुण्यात आणि मुंबईतही प्रकाशित झालंय.) तेच त्याचं महत्व सांगू शकतात आणि लताचा कार्यक्रम प्रेक्षागृहातून “लाईव्ह ” ऐकलेले कृतकृत्य श्रोते तिच्या सुरांची आकाशझेप अनुभवू शकतात. (याही बाबतीत आम्ही पती-पत्नी भाग्यवान आहोत.) […]

अमृतमयी, आनंदमयी – अमृतानंदमयी !

स्वामी चिदानंद आणि अम्मा या काळाने आमच्या पदरात टाकलेल्या विभूती आहेत. त्यांच्या सान्निध्यात सगळं सार्थक होतं. पण अम्मा “भेटतात”, कुशीत घेतात-मातृरूपाने ! विश्वभर त्या Hugging Saint म्हणून प्रसिद्ध आहेत. […]

बटबटीत आणि संयत !

” आजचा दिवस माझा ” ! चंद्रकांत कुळकर्णीने दिग्दर्शीय हाताचा परीस या कथेवर मनसोक्त फिरवला आहे. ही तर एका रात्रीची कथा ! पण सुरुवातीला “सिंहासन “जवळ जाणारा हा चित्रपट एकाएकी एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो. चवीला राजकारण जरूर आहे पण ही एका मुख्यमंत्र्याच्या “आतील ” मानवाचे हृद्य दर्शन घडविणारे कथानक आहे. […]

‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’

व्यक्तिमत्व आणि व्यवसाय यांना पूरक अशी collar tune असलेले ( ” माणसाने माणसाशी माणसासम वागणे ” ) श्री अशोक देशमाने यांच्याशी आज एकदाची भेट झाली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ७१ मुला -मुलींना आज त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पंखाखाली घेऊन मायेची उब दिलेली आहे. नवनवे उपक्रम त्यांच्या मनात आहेत आणि बरंच काही त्यांना अपेक्षित आहे. […]

अज्ञानाच्या गोणी !

इस्लामपूरला असताना गॅदरिंग /मॅगेझीन इंचार्ज म्हणून काम करताना स्वतःचे काही “हुनर ” दाखवायची संधी क्वचित मिळाली. दरवेळी इतरांसाठी सारं संयोजन-पडद्यामागे ! […]

दुपारची (दाहक) सूर्यकिरणे !

जीवनावरील असे भाष्य आपल्या पूर्वापार समजुतींना /गैरसमजांना तळापासून उद्ध्वस्त करते आणि परिपक्व होण्यासाठी लागणाऱ्या सत्याचे डोस पाजते. […]

नात्यांचा स्ट्रेस !

नाती -हवीहवीशी आणि त्रासदायकही ! निसर्गदत्त आणि बनविलेली ! जुळलेली आणि लादलेली ! निरपेक्ष आणि अपेक्षांचे ओझं असलेली ! एकतर्फी आणि दोन्ही बाजूंनी पेललेली ! […]

1 23 24 25 26 27 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..