Avatar
About मकरंद करंदीकर
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

दिव्यांची अमावस्या

दिव्यांच्या या अस्सल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. राजकारणी आणि व्यावसायिक प्रायोजक यांच्या प्रभावाखाली आपण आपल्या सणांचे खूपच विकृतीकरण केले आहे. आपला जुना धर्म आणि त्यामागील नवीन विज्ञान लक्षात घेऊन आपण आपल्याच सणांची विकृत थट्टा टाळायला हवी. […]

सौन्दर्य प्रसाधनांची जुनी पदचिन्हे !

सर्व प्राण्यांना जे काही नटवायचे ते निसर्गाने स्वतः:च नटविले आहे. पण मनुष्य प्राण्याला मात्र निसर्गाने दिलेले सौंदर्य अपूर्ण वाटते.अनादिकालापासून तो अधिकाधिक सौंदर्य प्रसाधनांच्या शोधात आहे. सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती त्याने हजारो वर्षांपासून चालविली आहे. अगदी मोहेंजोदरो आणि हडप्पा , ईजिप्शियन, ग्रीक अशा पुरातन संस्कृतीतून त्याची बीजे दिसतात. निसर्गाने जे सौंदर्य द्यायचे ते त्याने सर्व प्राण्यांमधील नरांना दिले […]

कोकण– ” टिपता किती टिपशील या कॅमेऱ्याने ” !

कोकणचे किनारे, मंदिरे, डोंगर आणि दाट झाडीने झाकलेला निसर्ग म्हणजे भन्नाटच ! आम्हाला दाभोळच्या खाडीतून जाताना आधी दुपार, मग संध्याकाळ, रत्नागिरीच्या जिंदाल कारखान्याजवळ आणि गणपतीच्या मंदिर परिसरात रात्र आणि दुसऱ्या दिवशी पावस खाडीजवळ पुन्हा स्वच्छ सकाळ लाभली. छायाचित्रांमध्ये तर माझी ” टिपता किती टिपशील या कॅमेऱ्याने ” अशी स्थिती झाली होती. जय परशुराम ! –मकरंद करंदीकर

रामेश्वरा, बघतस ना, काय चल्ला ह्या ?

माझ्या ऑफिसमधल्या परबकाकांच्या तोंडी हे पालुपद कायम असायचे. मुंबईत काम करणारे हे परब, शेकडो मैल लांब असलेल्या त्यांच्या या रामेश्वराच्या रेंजमध्ये कायमच असायचे. सिंधुदुर्गामधील आचरे येथील हा देव रामेश्वर म्हणजे मोठा जागृत देव ! भक्तांची देवावर श्रद्धाही तशीच गाढ. आपण कुठेही असलो आणि काही चुकीचं वागलो तर ” रामेश्वर बघता हा ” अशी भीती आणि काही […]

लोकल प्रवाशांसाठी हेलिकॉप्टरचे महाकाय पंखे !

नवे केंद्रीय मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर काही मंत्र्यांचे थेट कामाला लागणे लक्ष वेधून घेते. वृत्तपत्रे आणि चॅनेलीय मुलाखती, सत्काराच्या प्रचंड सभा, कार्यकर्त्यांच्या बैठकी, मोठमोठे दौरे असल्या गोष्टी टाळून काही मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यात श्री. सुरेश प्रभू यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी रेल्वे खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून रेल्वेचा कारभार सुधारण्यासाठी अत्यंत तळमळीने अनेक गोष्टी […]

हा छंद जीवाला लावी पिसे !

माणसाला जीवनात आवश्यक असलेले छंद !! .. माझा लेख -आजच्या “नवाकाळ”मध्ये ! माणसाला जीवनात आवश्यक असलेल्या छंदांसंबंधी माझा एक छोटेखानी लेख,आजच्या “नवाकाळ”मध्ये छापून आला आहे. आपल्या सर्वांसाठी हा लेख खाली देत आहे. आपला अभिप्राय जरूर कळवा . तसेच आपलेही काही वेगळे अनुभव आहेत का ? असे म्हणतात की शिक्षणावाचून माणूस म्हणजे अर्धाच .. पण अलीकडे असे […]

गुपचूप रद्द झालेली ५० रुपयांची नोट !

५०० व १००० च्या नोटा नुकत्याच रद्द झाल्या आणि मराठी भाषेला, विमुद्रीकरण–चलनबंदी– नोटबंदी — मुद्राबंदी इ. अनेक शब्द आणि ” वैचारिक वाद” लाभले. अनेक वृत्तपत्रे आजसुद्धा फक्त याच विषयावरच्या ” हेडलाईन्स” छापतायत. पण काही वर्षांपूर्वी भारतीय चलनातील ५० रुपयाची एक नोट चलनातून अत्यंत गुपचूपपणे काढून घेतली गेली. त्याचीच ही “नोटकथा” ! १९७५ मध्ये श्री.एम.नरसिंहम यांच्या सहीने […]

कुणकेश्वरची वालुकाशिल्पे !

कोकणातील कुणकेश्वर या अत्यंत सुंदर मंदिर परिसरात फिरण्याचा नुकताच योग्य आला. स्वच्छ समुद्र व हिरवागार निसर्ग यांच्या कोंदणामध्ये आपल्या भव्य मंदिरात वसलेला देव श्री कुणकेश्वर ! येथून अगदी जवळच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे खूप छान पर्यटक निवास आहे. कुणकेश्वर मंदिराच्या मागील किनाऱ्यावर एक वैशिष्ठ्य पाहायला मिळाले. देवळाच्या तटबंदीपर्यंत समुद्राच्या लाटा येऊन नंतर ओहोटी लागते. तेव्हा तेथील वाळूमध्ये […]

अरवलीचो वेतोबा !

बऱ्याचवेळा मित्रांकडून ऐकलेले हे एका जागृत देवाचे मंदिर पाहण्याचा मला योग आला. हे देऊळ वेंगुर्ल्यामधील शिरोडा येथे आहे. वि. स.खांडेकर शिरोड्याचे तर क्रिकेट विक्रमादित्य सुनील गावस्कर, साहित्यिक जयवंत दळवी, लालजी देसाई हे अरवलीचे आहेत. सर्व वाईट शक्तींवर वचक ठेवणारा शक्तिवान देव म्हणजे वेतोबा ! प्रशस्त मंदिर आणि गंभीर पण तितकेच देखणे असे देवाचे रूप ! हा […]

वालावलचा लक्ष्मीनारायण !

कुडाळ जवळील वालावल हे देखील निसर्गाने गर्द हिरव्या झाडीने झाकलेले असेच एक छान गाव ! येथील लक्ष्मीनारायणाचे देऊळ म्हणजे डोंगर, माड , तलाव , कलात्मक दीपमाळा अशा सर्व संपत्तीने सजलेले प्रशस्त देवस्थान आहे ! बहामनी सत्तेने आत्यंतिक धार्मिक छळ सुरु केल्यावर, गोव्यातील हरमळ येथून ही मूर्ती वालावल येथे आणण्यात आली, असेही म्हटले जाते. लक्ष्मीनारायणाची मूर्ती म्हटले […]

1 2 3 4 5
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....