जन्म परतफेडीसाठी
वपु काळे यांच्या एका पुस्तकातील हा उतारा. वाचा आणि विचार करा.. “आपण हा जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तींसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात, असं नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणा-या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात. ह्याचा अर्थ, कोणत्या तरी जन्माची एक परतफेड […]
