विचार बदला, आयुष्य बदलेल

एका राजाने दोन गरुड आणले आणि त्यांना शिकविण्यासाठी माणूस ठेवला .

काही दिवस गेले . एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, अगदी बघत रहावे असे .

दुसरा मात्र उडेचना.

राजा काळजीत पडला ,
अगदी सारखे दोन पक्षी. एक भरारी घेतोय दुसरा थंड.
काय करावे.. काय करावे..?

राजाने दवंडी पिटविली, गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून .
दुसऱ्या दिवशी पहाटेस राजा बागेत आला, बघतो तो दुसरा गरुड पहिल्या पेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संथ गिरक्या घेत होता .

राजाच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. हे अजब घडले कसे ? आणि केले तरी कोणी !

एक सामान्यसा दिसणारा शेतकरी अदबीने पुढ्यात आला आणि म्हणाला, “महाराज मी केले.”

राजा : अरे पण कसे ?
शेतकरी : मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली,

दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तुम्ही बघत आहातच.

तात्पर्य :-

आपली फांदी कधीतरी सोडून बघा.
सतत सुखद मर्यादित कवचांमध्ये स्वतःला गुरफटवून ठेवू नका.
कदाचित बाहेर अधिक सुंदर
खुले समृद्ध आकाश तुमची वाट बघत असेल.

Change ur thought…..
May change ur life….

“विचार बदला, आयुष्य बदलेल”
comfort zone मधुन बाहेर पडा. आहे त्या परीस्थीतीत जीवनाचा आनंद घ्या ….About Guest Author 507 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…