नवीन लेखन...

हुशार नोकर

एक महापंडित होते. सर्व शास्त्रांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्या जोरावर त्यांनी अनेक सभा जिंकल्या होत्या. मात्र महापंडित असूनही राजा आपल्याला ‘राजगुरु’ करीत नाही, ही त्याची खंत होती. एकदा ते राजाकडे गेले व आपणास “राजगुरू” करावे म्हणून साकडे घातले. राजा म्हणाला. माझ्या तीन प्रश्रांची उत्तरे दिलीत तर मी तुम्हाला राजगुरू करीन. उत्तरे पटली नाहीत तर मात्र […]

सोन्याचा उंदीर

खेड्यात राहणारा सदाशिव हुशार व चुणचुणीत मुलगा होता. मात्र गरिबीमुळे त्याला फार शिकता आले नव्हते. आपल्या आईबरोबर तो छोट्या झोपडीत रहात होता. मोठा व्यवसाय करून श्रीमंत व्हायचे त्याचे स्वप्न होते. म्हणून शेजारच्या मोठ्या गावी जाऊन नशीब आजमवायचे ठरवून व तसे आईला सांगून त्याने घर सोडले. त्या गावी एक श्रीमंत सावकार होता. गरजू लोकांना तो कर्ज देतो, […]

पै पै चा हिशेब

संत एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी हे गुरू. अगदी लहानपणापासून एकनाथ जनार्दन स्वामींच्या आश्रमात राहत होते. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम ते अतिशय आवडीने, तातडीने आणि लक्ष देऊन करीत असत. त्यामुळे त्यांना दिलेले कोणतेही काम अगदी बिनबोभाट आणि व्यवस्थित होत होते. एकनाथांचे हे कामावरील प्रेम पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना आश्रमातील आर्थिक व्यवहाराचा हिशोब ठेवण्याचे काम दिले होते. एकनाथ […]

तीन मूर्तींचे रहस्य

भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे ‘नवरत्न’ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे. एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती […]

वक्तशीरपणाचे महत्त्व

ठरलेल्या वेळेत ठरलेली कामे व्यवस्थित पूर्ण करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. त्यालाच वक्तशीरपणा म्हणतात. जगातील अनेक मोठे नेते वक्तशीरपणाबद्दल फारच आग्रही होते. ते त्यांच्या कार्यपद्धतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे देखील त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल फार प्रसिद्ध होते. कोणतेही काम त्या-त्या वेळी पूर्ण करण्याचे बंधन त्यांनी स्वतःवर घालून घेतले होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत ते […]

वेळेनंतरची उपरती

एक न्यायमूर्ती होते. अतिशय निःस्पृह व कर्तव्यकठोर म्हणून त्यांची ख्याती होती. खुनाचा आरोप सिद्ध झालेल्या प्रत्येक खुन्याला कोणीतीही दयामाया न दाखविता त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. कोणताही खून खटला त्यांच्या न्यायालयात असला की, आरोपीला फाशी होणारच हे जवळजवळ निश्चित झालेले असायचे. आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती घरातही तसेच वागायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लहानपणापासून प्रेम मिळाले नाही. […]

मोबाईलचा डायबेटीस

संक्रांतीच्या शुभेच्छा इतक्या वारेमाप झाल्या मोबाईलला माझ्या काळ्या मुंग्या लागल्या किती गोड किती गोड दुर दुरून बोलतात माणसं किती अगदी सहजपणे जवळून दूर जातात माणसं लांबचा वाटतो जवळचा जवळचा काय कायमचा कधीतरी येणाराच सण असतो महत्वाचा शुभेच्छा हव्यात कृतीत नको नुसत्या उक्तीत एकमेकांच्या असावं प्रेमळपणानं संगतीत मेसेज डिलीट करण्यातच अख्खी संक्रांत गेली मोबाईलची शु्गर लेवल मात्र […]

पुणे दर्शन

आडवी तिडवी वाट — वाकडेवाडी धनवान रस्ता — लक्ष्मी रस्ता आजोबांची पेठ — नाना पेठ थंड हवेचे ठिकाण — सिमला आॅफीस आदर्श वसाहत — माॅडेल काॅलनी एकमेकांना मदत करणारा गाव — सहकार नगर उग्र देवतेचा कट्टा — शनिपार देवांचे पाघरुण — पासोड्या विठोबा एक फल देणारा दरवाजा — पेरुगेट बेवडा ब्रीज — दारुवाला पूल दगडाचा देव […]

लक्ष्मीपूजन

दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी […]

1 2 3 4 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..