नवीन लेखन...

सोन्याचा उंदीर

खेड्यात राहणारा सदाशिव हुशार व चुणचुणीत मुलगा होता. मात्र गरिबीमुळे त्याला फार शिकता आले नव्हते. आपल्या आईबरोबर तो छोट्या झोपडीत रहात होता. मोठा व्यवसाय करून श्रीमंत व्हायचे त्याचे स्वप्न होते. म्हणून शेजारच्या मोठ्या गावी जाऊन नशीब आजमवायचे ठरवून व तसे आईला सांगून त्याने घर सोडले.

त्या गावी एक श्रीमंत सावकार होता. गरजू लोकांना तो कर्ज देतो, असे सदाशिवला कळले होते. त्यामुळे तो त्या सावकाराकडे गेला. परंतु घरात मरून पडलेल्या उंदराकडे बोट दाखवित सावकार म्हणाला की, काहीतरी तारण ठेवल्याशिवाय मी कर्जच काय; हा मरून पडलेला उंदीरही देणार नाही!

सदाशिव सावकाराला म्हणाला, “हा उंदीर मला द्या. मी त्याची एक दिवस तुमच्याकडे नक्कीच दामदुप्पट भरपाई देईन.”

सावकाराला वाटले, बरे झाले ही घाण आपोआप घरातून जात आहे. म्हणून त्याने सदाशिवला मेलेला उंदीर नेण्यास परवानगी दिली. सदाशिव तो उंदीर हातात घेऊन रस्ताने निघाला. एका दुकानदाराने ते पाहिले व त्याला म्हणाला, हा उंदीर माझ्या मांजरासाठी दे, मी त्या बदल्यात तुला थोडी ज्वारी देईन. सदाशिवने त्याच्याकडून ज्वारी घेतली व रस्ताच्या कडेला दगडाची चूल बांधून त्यावर भाजून त्याच्या लाह्या केल्या.

तेथून काही मोळीविके जात होते. लाकडे तोडून त्यांना खूप भूक लागली होती. सदाशिवने कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांना त्या लाह्या दिल्या. मोळीविक्यांनी खूश होऊन त्याला बरीच लाकडे दिली. सुदैवाने त्यात एक चंदनाचेही लाकूड होते. ते विकून सदाशिवला चांगले पैसे मिळाले.

मग त्याने लाकडाचाच धंदा सुरू केला. सदाशिवच्या प्रामाणिकपणामुळे धंद्याला बरकत आली व थोड्याच दिवसात तो श्रीमंत व्यापारी झाला एके दिवशी सदाशिवने एका सोनाराकडून सोन्याचा उंदीर तयार करून घेतला व तो घेऊन त्या श्रीमंत सावकाराकडे गेला.

सदाशिव त्याला म्हणाला, काही वर्षांपूर्वी तुम्ही मला कर्ज म्हणून एक मेलेला उंदीर दिला होता. त्याच्या भरपाईसाठी मी हा सोन्याचा उंदीर घेऊन आलो आहे;. तो तुम्ही स्वीकारावा.

श्रीमंत सावकारालाही तो प्रसंग आठवला व सदाशिव भरपाई म्हणून सोन्याचा उंदीर देत असल्याचेपाहून त्याला आश्चर्य वाटले. नंतर त्याने गावातील समस्त व्यापाऱ्यांना बोलावून खास सभेत ही कथा सांगून सदाशिवचा यथोचित सत्कार केलो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..