Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

 परमोच्य बिंदु

ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते   एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते   तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते   तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय  होऊन जाता सारे परि […]

दर्पण

चित्र उमटते दर्पनात ते,  सुंदर असेल जसे तसे धूळ सांचता दर्पना वरी,  चित्र स्पष्ट ते दिसेल कसे   दर्पना परि निर्मळ मन,  बागडते सदैव आनंदी दुषितपणा येई त्याला,  भावविचारांनी कधी कधी   निर्मळ ठेवा मन आपले,  झटकून द्या लोभ अहंकार मनाच्या  त्या पवित्रपणाने,  जीवन होत असे साकार   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

सुप्त चेतना

दिव्याची ज्योत पेटली,  वात दिसे जळताना जळेना परि वात ती,  दिव्यांत तेल असताना, जळत असते तेल,  देवूनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा बागडे मूल आनंदी,  तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते कष्ट त्याग हे जळती,  सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना,  जाणतील का कुणी ?   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

ध्यान

ध्यान कसे लावावे,  मार्ग असे मनोहर सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार…..१ स्वच्छ एक आसन,  शांत जागी असावे मांडी त्यावर घालून,  स्थिर ते बसावे…२ लक्ष्य केंद्रीत करा,  तुमच्या श्वासावरी कसा फिरे वारा,  आत आणि बाहेरी…३ साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत शांत करिल मना, बघून प्राण ज्योत…४ काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान करण्यास तुम्ही जावे,  जाईल […]

तेज

किरणात चमक ती असूनी,  तेजोमय भासे वस्तूंचे अंग सूक्ष्म अवलोकन करीता,  कळे तेज ते, वस्तूचाच भाग…..१,   जसे तेज असे सूर्याचे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील,  सर्व जनांना हेच सांगते…२,   तेजामुळेंच वस्तू दिसती,  विना तेज ती राहील कशी तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

खोटा शिक्का

कसे आले कुणास ठाऊक    नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी    खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी    कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी     निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी     तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया    अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी     त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी     यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श […]

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे….१ तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली….२ जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला….३ माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती….४ मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे […]

काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची […]

सुदाम्याला ऐश्वर्य

गरिब सुदामा बालमित्र तो,   आला हरीच्या भेटीला बालपणातील मित्रत्वाची,   ओढ येवूनी मनाला….।। छोटी पिशवी घेवूनी हाती,    पोहे घेतले त्यात फूल ना फुलाची पाकळी घ्यावी,   हीच भावना मनांत….।। काय दिले वहीनींनी मजला,  चौकशी केली कृष्णाने झडप घालूनी पिशवी घेई,   खाई पोहे आवडीने….।। बालपणातील अतूट होते,   मित्रत्वाचे त्यांचे नाते मूल्यमापन कसे करावे,  उमगले नाही कृष्णाते….।। समोर असता सुदामा, […]

 शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,   आकाशाला जावूनी भिडती नष्ट करूनी डोंगर जंगल,    हा: हा: कार तो माजविती…१ शब्दांची ही ठिणगी अशीच,   क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां,   अहंकार तो जागृत होई…२, सूड वृत्तीचा जन्म होवूनी,    वातावरण ते दुषीत होते संघर्षाचा अग्नी पेटूनी ,   जीवन सारे उजाड करिते…३, कारण जरी ते असे क्षुल्लक,    विनाश व्याप्ती होई […]

1 2 3 147