नवीन लेखन...
Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग २

दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्‍याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग १

मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत.  […]

महाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल

भारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे. आसाम मधील दिब्रुगड ते धेमजी अरुणाचल प्रदेश अशी दोन महत्वाची राज्ये जोडली जाणार आहेत. या पुलामुळे नेहमीचा रेल्वे प्रवास ११० ते १३० किमीने कमी होणार आहे, तर रस्त्याने प्रवासात ४०० ते ५५० किमी अंतराची बचत होणार आहे. […]

डी. बी. के. रेल्वे प्रकल्प

हा रेल्वे मार्ग बांधणी म्हणजे इंजीनियरिंगचा एक पराक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. रेल्वेने १९६३ च्या सुमारास या खडतर विभागातून ११० किमी अंतराची कठिण रेल्वे लाईन बांधली. समुद्रसपाटी पासून सुरु होणारा हा मार्ग अनंतगिरी घाटमार्ग पार करत अराकू हिल स्टेशन पर्यंत गेलेला आहे. […]

डास चावताना घडणारा घटनाक्रम

हजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे. […]

रक्तरंजित आघातातून उभे राहिलेले पवित्र स्थान – सोरटी सोमनाथ

सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे. […]

मानव जातीचा कर्दनकाळ – एक क्षुद्र मच्छर

पृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणार्‍या कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व पोटजाती आहेत.माणसांमध्ये मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग आफ्रिकन पीत ज्वर, चिकन गुनिया व मेंदूचा दाह हे रोग होण्यास ते कारणीभूत असतात. […]

मलेरियाचा इतिहास – भाग ६

मलेरियाच्या परोपजीवांच्या पूर्वजांचा जन्म पृथ्वीतलावर काही लाख वर्षांपूर्वी झाला असावा. Molecular Genetics च्या आधारे असे सिद्ध झाले आहे की यांचे पूर्वज हे एकपेशीय होते व ते पाण्यातील मणके नसलेल्या किड्यांच्या शरीरात वाढत असत. […]

पाणी पाणी

माझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे. […]

निसर्गरम्य तळकोकणचा  प्रवास – आरामदायी  तेजस एक्सप्रेसने

कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही  ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना  तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. […]

1 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..