पाकिस्तानमधला प्रवेश
१९९६ च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी खरंच पेशावरमध्ये तिच्या घरी जाऊन उभा राहिलो, तेव्हा रझियाचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. ‘गोखलेसाब आप? ‘ म्हणतानाचे तिच्या डोळ्यांतले अत्यानंदाचे ते भाव आणि न्यूयॉर्क सोडतानाचा तो चेहरा यात बरंच अंतर होतं. रझियाच्या भावांनी तर अगदी आलिंगन देऊन स्वागत केलं. मी त्यांच्या शेजारी बसलो. फोटो काढले, म्हटलं पाहा, ‘तुमच्या माझ्यात काही फरक आहे का? ‘ त्यांच्याबरोबर जेवलो. पेशावरमध्ये फिरलो. यात कुठेही दोन राष्ट्रांतल्या शत्रुत्वाची दरी नव्हती. […]
