नवीन लेखन...

माजी पंतप्रधान राजीव गांधी

कार्यकाळ: ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९

जन्म: २० ऑगस्ट १९४४
मृत्यू: २१ मे १९९१

भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे महत्त्वाचे काम राजीवजींनी केले. त्यांनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. संगणक, दूरसंचार क्षेत्राच्या प्रगतीसाठी त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपविण्याचा प्रयत्नदेखील राजीवजींनी केला.

भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी यांनी विज्ञानाची कास धरीत देशाच्या प्रगतीला दिशा दिली. देशाच्या आजच्या वैज्ञानिक विकासाचे श्रेय निर्विवादपणे राजीवजींना दिले जाते. राजीवजी इंदिरा गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र. इंदिराजींच्या निधनानंतर राजीवजींना वयाच्या ४०व्या वर्षी पंतप्रधानपदाची | जबाबदारी सांभाळावी लागली. ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान ठरले. राजकारणात येण्यापूर्वी राजीवजी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. इंग्लंडमधील केंब्रिज येथे असताना त्यांची ओळख सोनियाजींशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. धाकटे बंधू संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीवजींनी राजकारणात प्रवेश केला.

राजीवजींच्या नेतृत्त्वाखाली १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीवजींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. त्यांनी भारताला संगणकयुगाची ओळख करून दिली. तसेच दूरसंचार क्रांतीचा प्रारंभही त्यांच्याच कार्यकाळात झाला. राजीवजींनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन या देशांसोबतही चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी १९८८ मध्ये श्रीलंकेत ‘शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसमवेतच्या संघर्षात झाली. १९९१ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत लिट्टेने राजीवजींची हत्त्या केली. राजीवजींना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..