नवीन लेखन...

मराठी भाषा दिन

मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो.
[…]

सारोळ्याचे वनपर्यटन

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
[…]

लोकसाहित्यातील अभ्यासकांना नवा आहेर

बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांच्या निमित्ताने अहिराणी या खानदेशी बोलीभाषेशी परिचित झालो; परंतु ती खरी अहिराणी नसून खानदेशी वऱहाडी भाषा असल्याचे प्रा. डॉ. उषाताई सावंत यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या शोधनिबंधपर पुस्तकातून आपणास ज्ञात होते. एखादी खरी व नवीन माहिती देण्याचे ध्येय या एकाच उदाहरणावरून कसे या पुस्तकास साध्य झाले आहे, ते लक्षात येते.
[…]

गिरिभ्रमण – एक सशक्त खेळ

नितांतसुंदर निसर्गाशी जवळीक साधणं, डोंगरदऱयांच्या सहवासात रमणं यासारखा आनंद नाही. हा आनंद घेणारे; दुर्गभ्रमण आणि गिर्यारोहणाचा छंद डोळसपणे जपणारे आनंद पाळंदे यांनी `डोंगरमैत्री’ या पुस्तकामध्ये निसर्गनवलाईचे रसिकांना साक्षात दर्शन घडविले आहे.
[…]

काव्यमय व्यक्तिचित्रण

`घरीदारी’ या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत. `घरीदारी’ :  लेखक : इंद्रजित भालेराव    

रेषालेखकाचे `सहप्रवासी’

`प्रतिभावान रेषालेखक’ असे ज्यांना विजय तेंडुलकरांनी म्हटले ते ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांचे `सहप्रवासी’ हे नवे चौरसाकृती पुस्तक. मुखपृष्ठ आणि आतील एक-दोन चित्रे वगळता या पुस्तकात रेषा आहेत, त्या इतर व्यंगचित्रकारांच्या. सरवटे इथे `लेखक’ म्हणून येतात. साठ-एक वर्षांच्या त्यांच्या दीर्घ चित्रप्रवासातील सुहृदांविषयी सरवटे यांनी वेळोवेळी लिहिलेले हे लेख आहेत. […]

वैद्यकीय क्षेत्रातील निर्मळ कथन

डॉ. रवी बापट यांचे नाव सुरेश भट आणि पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडून वारंवार ऐकले होते. डॉक्टरांची हे दोघेही कायम स्तुतीच करीत. माझा आणि मुंबईचा तसा संबंध नाही आणि मुंबईतल्या डॉक्टरांचा तर त्याहून नाही. त्यामुळे बापट हे कोणी तरी बडे डॉक्टर आणि अधूनमधून साहित्यिकांवर उपचार करतात, असा एक समज माझ्या मनात होता. या पूर्वग्रहासह मी डॉ. बापट यांचे हे आत्मकथन वाचायला घेतले आणि डॉ. बापट यांच्याबद्दल माझे दोन मित्र जे बोलत त्यातले अक्षरही खोटे नव्हते, हे लक्षात आले. […]

हृदयाचे वेगवेगळे आजार

हृदयाचे वेगवेगळे आजार हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांसंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहू : जन्मजात दोष : काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत हे लक्षात आले की त्यांच्या हृदयाच्या रचनेत जन्मतःच दोष असतो. त्यामुळे वेगवेगळ्या व्याधी त्यांना त्रस्त करीत असतात. रचनेसंबंधीच्या दोषातून उद्भवलेल्या या व्याधीवर शल्यक्रिया हा उपचार लाभदायक ठरतो. हृदयाच्या थैलीला अतिसूक्ष्म छिद्र असणे किंवा हृदयाच्या झडपांमध्ये काही दोष असणे […]

1 216 217 218 219 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..