स्फोटानंतरचे वाकयुद्ध

वाराणसी येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे बर्‍याच दिवसांची शांतता मोडीत निघाली असून हिणकस प्रवृत्तीचे अतिरेकी आजही देशात मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे सिद्ध झाले आहे. […]

संपूर्ण साक्षरतेचे स्वप्न दूरच

शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबवून आणि कोट्यवधी रुपये खर्च करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने अखेर मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे शिक्षणाची गंगा सर्वदूर पसरेल अशी आशा निर्माण झाली. पण, या कायद्यातील काही त्रुटी लक्षात घ्यायला हव्यात. त्या वेळीच दूर केल्यास मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची फलश्रुती दिसून येईल. […]

करामती कॅमेरा

मोबाईलमधील कॅमेरा छायाचित्रे काढण्यासाठी किवा छायाचित्रण करण्यासाठी वापरला जातो. पण, काही अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यास हा कॅमेरा आपल्याला व्यक्ती, ठिकाण याबद्दलची माहिती देऊ लागतो, स्कॅनर म्हणून वापरता येतो, ट्विटर किंवा फेसबुकवर कोण काय करत आहे हे सांगतो. त्यासाठी मोबाईलमध्ये कॅमेऱ्याबरोबरच जीपीएस, इंटरनेट, कंपास आणि विशिष्ट अॅप्लिकेशन्स असावे लागते. […]

रोईंगचा सुवर्णाध्याय

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची भरघोस कमाई केल्यानंतर भारतीय खेळाडूंचे आशियाई स्पर्धेतील अपयश अधिकच उठून दिसत होते. त्यात सेनादलाच्या बजरंगलाल ताखर या जवानाने रोईंगच्या सिंगल्स स्कल प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाची प्रतिष्ठा राखली. राजस्थानमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावातून आलेल्या बजरंगलालने अपुर्‍या आणि दर्जाहीन सुविधांसह खडतर परिश्रम करून हे पदक मिळवले. […]

भ्रष्टाचाराला ‘टाटा’ नाही !

सध्याच्या उदारिकरणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्याला विमान कंपनी उभी करण्यासाठी ठरावीक मंत्र्याला लाच देण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगितले. उद्योगपती राहुल बजाज यांनी तर अशी लाच सर्रास दिली जाते असे सांगून आणखी एक गौप्यस्फोट केला. एकंदरित, भ्रष्टाचाराला ‘टाटा’ करण्याची कोणाचीच मानसिकता दिसत नाही. […]

अन्नधान्याच्या लागवडीला हवे प्राधान्य

राज्यात आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, यावेळी ज्वारीचे उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित असताना पहायला मिळणारी घट चिंताजनक आहे, याचा शेतकर्‍यांनी विचार करायला हवा. त्यामुळे पर्यायी पिकांची लागवड करताना अन्नधान्याच्या लागवडीलाही महत्त्व द्यायला हवे आहे. […]

हे सत्तांतर काय सांगते ?

एक चव्हाण गेले आणि दुसरे चव्हाण आले. राज्याच्या राजकारणात किंवा समाजकारणात त्यामुळे काय स्थित्यंतर येईल? पृथ्वीराज चव्हाण राज्याची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतील का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी उफाळून आली असून छगनराव भुजबळ यांचा काटा पक्षातील मराठा लॉबीने काढल्याने अंतर्गत धुसफूस वाढेल का ? ही स्थित्यंतरे काय दर्शवतात?
[…]

‘आदर्श’ हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे. कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत.
[…]

ओबामांची मुत्सद्दी भारतभेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्‍यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले.
[…]

सोनेखरेदीपूर्वी…

डिसेंबरअखेरपर्यंत चालणार्‍या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर सोनेखरेदी केली जाते. ब्रॅंण्डेड बार्स, कॉईन्स आणि दागिन्यांच्या स्वरूपात ही सोनेखरेदी केली जाते. पण, आता गोल्ड इटीएफसारखे अधिक सुरक्षित आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या पर्यायांचा उपयोग करावा असे तज्ज्ञांचे मत आहे. नेहमी चांगला परतावा देणार्‍या सोन्याच्या बाजारपेठेविषयी.
[…]

1 2 3 4 5