नवीन लेखन...

वाड्मयानेच घडविले

लेखक : प्रा. रा. ग. जाधव – अद्वैत फिचर्स 

आई-वडिलांमुळे लहानपणापासूनच साहित्याची आणि लेखनाची गोडी लागली. शिस्तबध्द लेखनाची पध्दत, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अशा कितीतरी गोष्टी आयुष्याच्या प्रवासात शिकायला मिळाल्या. वैचारिकदृष्ट्या मी अधिकाधिक परिपक्व होत गेलो. माझ्याभोवती नेहमी चांगली माणसं होती. त्यामुळे बिघडण्याची संधीच मला मिळाली नाही. वैचारिक जडणघडण होण्यासाठी साहित्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं माझं ठाम मत आहे.


माझे वडील बडोदा संस्थानमध्ये फडणीस (आजच्या भाषेत कारकून) होते. तेथील शाळेमध्ये मराठी शिकवणारे शिक्षक कविता फार रंगवून सांगत असत. कोणत्याही साहित्यिकाच्या दृष्टीने शालेय जीवनातील मराठीचा अभ्यास फार नि्णयिक ठरत असतो. माझ्या सुदैवाने शाळेत असल्यापासूनच मला मराठी वाडमयाची आवड निर्माण होईल, असं वातावरण लाभलं. माझ्या वडिलांना बालगंधर्वांची अनेक नाटकं अक्षरश: तोंडपाठ होती. आई जुनी पौराणिक गाणी म्हणत असे. या साऱ्याचा माझ्या बालमनावर चांगलाच परिणाम झाला. आमच्या शाळेमध्ये वा. दा. गोखले हे साहित्यिक येत असत. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (मसाप) कार्यवाह होते. मसापतर्फे साहित्यविषयक परीक्षा घेतल्या जातात, त्यासाठी कोणाला बसायचं असेल तर सांगा, असं गोखले यांनी आम्हा मुलांना सांगितलं. आपण या परीक्षेला बसायचं, असं मी ठरवलं. एकेक परीक्षा देत गेलो आणि दहावीला असतानाच साहित्य विशारद ही परीक्षा उत्तीर्ण झालो. साहित्य विशारद ही बी.ए.च्या तोडीची परीक्षा मानली जाते. ती दहावीतच उत्तीर्ण झाल्याने माझा आत्मविश्वास वाढला. मुळातच साहित्याची आवड होती. पुढे १९४० च्या आसपास आम्ही पुण्यात आलो. त्याठिकाणी साहित्याला पोषक असं वातावरण लाभलं.

सर परशुराम महाविद्यालयात (एसपी) शिकत असतानाच मी एस. टी. मध्ये नोकरीही करत होतो. एसपीमध्ये सोनोपंत दांडेकर प्राचार्य होते. पु. ग. सहस्त्रबुध्देसारखी मंडळी तेथे कार्यरत होती. महाविद्यालयाने सोनोपंत दांडेकर यांच्यावर काढलेल्या विशेषांकात माझी कविता प्रसिध्द झाली होती. त्यावेळी मराठीचा तास शेवटचा असे आणि मला तर तिसऱ्या पिरिएडनंतरच नोकरीसाठी जावं लागे. त्यामुळे महाविद्यालयात असताना मी मराठीच्या तासांना फारसा उपस्थित राहू शकलो नाही. यादरम्यान मी साहित्य परिषदेतील वर्गांनाही जात असे. तेथे अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन लाभलं.

त्यावेळी वसंत व्याख्यानमालेत स्वातंत्र्यानंतर मध्यमवर्गाचं भवितव्य काय?’ या विषयावर निबंधस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मला बक्षिस म्हणून पंडित नेहरुंचं आत्मचरित्र मिळालं होतं. असं सारं सुरु असतानाच माझी नाशिकला बदली झाली. तेथील वातावरणही साहित्याला खूप पोषक होतं. १९५० ते १९६० अशी दहा वर्षे मी नाशिकला राहिलो. तेथे कुसुमाग्रज तर होतेच, शिवाय वसंत कानेटकर, अ. वा. वर्टी यांच्यासारखे साहित्यिक, ओक, देवस्थळी यांच्यासारखे गणिततज्ज्ञ होते. तेथील लोकहितवादी मंडळाअंतर्गत साधना विभाग होता. विविध वक्त्यांची व्याख्यानं आयोजित करण्याचं काम साधना विभाग करत असे. मी त्या विभागात असल्यामुळे अनेक साहित्यिकांच्या घरी जाण्याचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला. नाशिकमध्ये मला चांगला मित्रपरिवारही मिळाला. केवळ नाशिकमध्येच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी मला चांगल्या माणसांचा सहवास लाभला. आपल्या आयुष्यात नद्यांचा काहीतरी जवळचा संबंध असावा, असं मला नेहमी वाटतं. माझा जन्म नदीकाठच्या गावात झाला, नाशिकमधील महत्त्वाची दहा वर्षे गोदाकाठी गेली. पुढे विश्वकोषातील २० वर्षे वाईला कृष्णाकाठी राहिलो आणि आता आयुष्याच्या उत्तरार्धात पुण्यात मुठेच्या काठाशीच वास्तव्य आहे.

नाशिकला असताना ‘गावकरी’च्या साप्ताहिक पुरवणीचं संपादन मी करत असे. त्या पुरवणीतून ‘मालती माधव’ या संस्कृत नाटकाचं क्रमश: भाषांतर मी केलं. पुढे बी.ए. झालो. मराठी हाच स्पेशल विषय घेऊन पुणे विद्यापीठातून एमएही केलं. या परीक्षेतही मला चांगले गुण मिळाले होते. त्याचदरम्यान एका गव्हर्नमेंट कॉलेजची जाहिरात प्रसिध्द झाली होती. ती पाहून मी अर्ज केला आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून अमरावतीला रुजू झालो. त्या ठिकाणी मला सुधीर रसाळ, गो. मा. पवार यांच्यासारखे सहकारी भेटले. सौंदर्यशास्त्राचे चिकित्सक रा.भा.पाटणकर, के. ज. पुरोहित (शांताराम) यांचा सहवास मला येथेच लाभला. पुढे मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये रुजू झालो. त्याठिकाणी म. वि. राजाध्यक्षांसारख्या साहित्यिकाची संगत लाभली. नंतर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात दाखल झालो. त्याठिकाणीच मला दलित साहित्याचा साक्षात्कार झाला. अमरावती, मुंबई आणि औरंगाबाद येथील तिन्ही महाविद्यालयांतील वातावरण वेगवेगळं होतं. मला अनेकदा असं वाटतं, मिलिंद महाविद्यालयात मी दलित विद्यार्थ्यांचा प्राध्यापक झालो नसतो तर पुढे कदाचित लिहू शकलो नसतो. त्याठिकाणी मला बरंच काही जवळून पहायला, अनुभवायला मिळालं. त्यावेळच्या अनेक विद्यार्थ्यांपैकी यशवंत मनोहर हा माझा विद्यार्थी.

नंतर १९७० मध्ये मी वाईच्या विश्वकोषात रुजू झालो. त्याठिकाणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा सहवास लाभला. मी मानव्य विद्यांच्या विभागाचा प्रमुख होतो. त्यामुळे या विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक विषयांचं वाचन करावं लागे. आपसूकच अनेक शास्त्रांचा अभ्यास होत गेला. हे सारं करत असताना ज्ञान म्हणजे काय हे कळलं नाही, पण अज्ञान म्हणजे काय हे मात्र नक्की उमगलं. शिस्तबध्द लेखनाची पध्दत, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अशा कितीतरी गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या. वैचारिकदृष्ट्या मी अधिकाधिक परिपक्व होत गेलो. माझ्याभोवल नेहमी चांगली माणसं होती. त्यामुळे बिघडण्याची संधीच मला मिळाली नाही.

विश्वकोषात दाखल होण्याच्या आधीच मी लेखन करतच असे. सगळं लेखन मी स्वतःला समजून घेण्यासाठीच केलं. हल्लीच्या लेखक-कविंना झटपट प्रसिध्दी हवी असते. तशी साधनंही उपलब्ध आहेत. माझ्या पिढीच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती. पु. शी. रेगेंच्या मासिकातर्फे एक कविता स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये मला आणि अन्य एक स्पर्धकाला प्रत्येकी २५ रुपये विभागून बक्षिस मिळालं होतं. पुढे य. गो. जोशी यांनी त्यांच्या मासिकासाठी कथास्पर्धा घेतली. त्यामध्ये मी लिहिलेल्या ‘कबुतरांचं जग’ या कथेची निवड झाली. य. गोंच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचाही योग आला. य. गो. त्यावेळी मला म्हणाले होते. | अजून लहान आहेस, लेखनाच्या बाबतीत कोणाचंही अनुकरण करु नकोस, कोणताही शिक्का कागदावर उमटताना त्याची अक्षरं उलटी उमटतात.’ त्यांचे ते शब्द माझ्यासाठी खूप मार्गदर्शक ठरले.

मला विंदांची कविता आवडत असे कथा, कविता लेखनाला एक प्रकारचं मानसिक स्वास्थ लागतं. काही व्यावहारिक अडचणींमुळे मला ती एकाग्रता लाभली नाही आणि माझं कथा-कविता लेखन मागे पडलं अमरावतीला असताना मी एक एकांकिका लिहिली होती. उमाकांत भेंडे यांनी ती वाचल “शिरवाडकरांना ही एकांकिका दाखव’ अस सल्ला त्यांनी मला दिला. त्याप्रमाणे कुसुमाग्रजांना मी ती दाखवली. त्यांनाही ती आवडली. त्यांनी एका निर्मात्याला त्याविषये सांगितलं. तो त्यावर नाटक करणार होता. पण, त्याच्या घराला आग लागली आणि मड ती नाटकाची पहिली-वहिली संहिता त्यामध्ये जळून खाक झाली. अशाच आणखीही काहे घटना घडल्या. संत तुकारामांच्या अभंगांवर “आनंदाचे डोह’ नावाचं समीक्षात्मक लेखन स केलं होतं. पानशेतच्या पुरामध्ये ही प्रत वाइन गेली. २५ लघुनिबंध लिहून ते हस्तलिखित ‘साधना’कडे दिलं होतं. तेही पानशेतच्या पुरामध्ये नष्ट झालं. अशी एकापाठोपाठ एक माझी तीन अपत्यं गेली. पण, हे अपघात झाले नसते तर कदाचित आज माझी ओळख वेगळीच असती. लोकांनी मला

वैचारिक जडणघडण होण्यासाठीं साहित्याशिवाय दुसरा पर्वाव नाहीं. लेखन करत असताना समीक्षेची तर्कशुध्द आवश्यक असते, हे माझ्या लक्षात आलं. त्यासाठी आवश्यक असणारी पायाभूत तत्त्वं अभ्यासावी लागतात. साहित्याचा आणि समाजाचा संबंध अतूट आहे. समाजञातूनच साहित्य निर्माण होतं.

समीक्षकाऐवजी कथा-कादंबरीकार, कवी म्हणून ओळखलं असतं. असो! वैचारिक जडणघडण होण्यासाठी साहित्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं माझं ठाम मत आहे. त्या काळी माझ्यासमोर साहित्याची आवड जपण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. नवभारत’मध्येही मी बरंच लेखन केलं. हे सारं करत असताना समीक्षेची तर्कशुध्द आवश्यक असते, हे माझ्या लक्षात आलं. त्यासाठी आवश्यक असणारी पायाभूत तत्त्वं अभ्यासावी लागतात. साहित्याचा आणि समाजाचा संबंध अतूट आहे, समाजातूनच साहित्य निर्माण होतं, हे लक्षात घ्यावं लागतं. मी ‘कलावबादीही नाही आणि जीवनवादीही नाही तर मी साहित्यवादी आहे. साहित्य हे स्वतंत्र जीवनमूल्य आहे. ते कशाचंही साधन नाही. एकेकाळी मी अस्तित्ववादी होतो. कला वगैरे गोष्टींना काही अर्थ नाही, असं मी लिहिलंही होतं. कशालाच काही अर्थ नाही, असं वाटणारा तो काळ होता. पण या अर्थशून्यतेकडून अर्थपूर्तिकडे माझा प्रवास झाला.

व्यावहारिक जीवनातील स्थित्यंतरं माझ्या पथ्यावरच पडली, असं नेहमी वाटतं. मी जेथे जेथे गेलो त्या ठिकाणी मला चांगली माणसं भेटली. कोणतीही गोष्ट करत असताना स्वतःची आंतरिक श्रीमंती, जीवनाकडे पाहण्याची क्षमता वाढली की नाही हे महत्त्वाचं आहे. इतर गोष्टी करताना माणसाची श्रीमंती कशामध्ये आहे, हे ‘कळलं पाहिजे. हे कळण्यासाठी निर्विवादपणे विश्वसनीय साधन म्हणजे वाड्मय. आयुष्याची श्रीमंती वाढवण्यासाठी साहित्यासारखं दुसरं विश्वसनीय काहीच नाही, असं माझं ठाम मत आहे. मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईन, असं कधी वाटलंही नव्हतं. पण, तो सन्मान माझ्या वाट्याला आला. यापूर्वी मी सदाशिव पेठेत एका छोट्या जागेत रहात होतो, आता शनिवार पेठेत मोठ्या घरात रहात आहे. आधीच्या परिस्थितीत मी दु:खी नव्हतो किंवा आता आनंदाने भारावून गेलो आहे असंही नाही. हा विवेक मला साहित्याने दिला. साहित्याने दिलेली ही श्रीमंती चिरंतन आहे आणि त्यामुळेच त्याविषयी मी कृतज्ञ आहे.

प्रा. रा.ग. जाधव

अद्वैत फिचर्स (SV10)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..