नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

मेरा भारत महान

मेरा भारत महान असं ट्रकच्या मागे लिहिलेले दिसतं. परंतु हे वाक्य वाचणारा मंत्री त्याचे कार्यकर्ते व देशातील इतर नागरिक त्यांच्या गाडीच्या मागे मात्र, ‘मेरा भारत महान’ असं लिहिताना दिसत नाहीत. ही बाब विचारतंद्री वाढवणारी आहे.असं का होतं? ट्रकवाला सोडून देशातील इतर लोकांना का वाटत नाही, की माझ्या गाडीच्या मागे मेरा भारत महान असं वाक्य असलेलं असावं. […]

मिरवणूक

घटस्थापना.. अर्थात घरोघरी देव बसतात. नऊ दिवस घरोघरी देवीची उपासना केली जाते.सप्तशतीचे पाठ पठण केले जातात. देवीची विविध स्तोत्रे, आरत्या म्हंटल्या जातात.याचवेळी नऊ दिवस विविध मंडळाच्या दुर्गादेवी पण बसतात. […]

कॅाफीपुराण

मी आणि आमच्या घरचे सर्वच चहावाले ! घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफी बनवायची! […]

दिवाळी आणि रांगोळी…

दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली . […]

आठवण काचेच्या विविधरंगी बांगड्यांची

गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य. […]

मौज टांग्याची

अनेक वयस्कर लोकांच्या लहानपणच्या आठवणीत टांगा नक्कीच असणार. आॅटो रिक्षा सुरु होण्याआधी गावातल्या गावात, बाहेरगावाहून ट्रेनने प्रवास करून आल्यावर स्टेशनपासून, बसस्टँडपासून घरी जाण्याचा तोच एक मार्ग ,पर्याय होता. आणि लहानपणी तर टांग्यात बसणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असे. त्यात चढणं तितकं सोपं नसायचं..थोडं जिकिरीचंच असायचं , अगदी लहान असताना बाबा, काका उचलूनच ठेवायचे…पुढे स्वतः चढणं सुरु केलं ..केवढा आनंद असायचा तो. […]

बर्म्युडा

जवळपास सगळ्या शहरात हे चित्र दिसते. पनीर पिझ्झा खाऊन गुबगुबीत झालेलं कुत्रं मालकासोबत डुलत डुलत अख्ख्या कॉलनीत फिरून वजन हलकं करूनच घरी जातं. त्याच्या सर्व विधी आटोपतांना मालकाच्या चेहर्‍यावर इतके संतुष्टीचे भाव उमटतात की जणू काही त्यांचाच भार कमी झालाय. […]

माझी मराठी

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
यानिमत्ताने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी एक लेख स्पर्धा आयोजित केली होती. लेखाचा विषय होता माझी मराठी. यासाठी मी लेख पाठवला होता लेख स्वीकारला गेला परंतु बक्षीस मिळाले नाही. ठीक आहे, तरी माझा हा लेख वाचून कसा वाटला याचा अभिप्राय द्या. […]

श्वेतांबरा

आज नवरात्रीचा दुसरा दिवस..देवी ब्रह्मचारिणीचा.. देवी ब्रह्मचारिणी म्हणजे देवी पार्वती. शंकरदेवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीने घोर तपश्चर्या केली..साहजिकच या काळात ती शुभ्रवस्त्र परीधान करीत असे.. म्हणूनच आजच्या दिवशी महिला पांढरेवस्त्र परीधान करून देवी ब्रह्मचारिणीची पूजा करत आहेत.. […]

बहु काय बोलू आतां..?

मराठीची पताका क्षितिजापार नेऊन ठेवणारी ज्ञानशलाका म्हणजे ज्ञानेश्वरी.. महाराष्ट्र शारदेच्या चरणी तिच्या सुपुत्राने अर्पण केलेलं सदोदित सहस्त्रदलकमल म्हणजे ज्ञानेश्वरी, माऊलीच्या कळवळ्याने भक्ती-ज्ञानाचा साक्षात अमृतार्णव पाजणारी चिद्विलासी अखंडता म्हणजे ज्ञानेश्वरी. […]

1 2 3 4 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..