नवीन लेखन...

अभिनेते उपेंद्र दाते

 

उपेंद्र केशव दाते यांचा जन्म १२ जुलै १९४८ रोजी नाशिक येथे जन्म झाला. त्यांचे प्राथमिक , शालेय शिक्षण रुंगठा हायस्कुल मध्ये झाले. त्यांचे महाविद्यलयीन शिक्षण के.टी .एम .एच . महाविद्यालयात झाले. त्यांचे वडील एक खाजगी बँकेमध्ये मॅनेजर होते. तर त्यांच्या आईचे नाव सुधा होते त्या व्यायामाच्या शिक्षिका होत्या. मुलीनी व्यायाम करावा , सर्व खेळ खेळावेत या साठी त्यांनी नाशिकमध्ये त्यावेळी खूप प्रसार केला.

उपेंद्र दाते यांनी चौथीमध्ये असताना गॅदरिंग मध्ये ‘ चढाओढ ‘ या नाटकात काम केले. . नाटकाशी त्यांचा संबंध फक्त गॅदरिंगच्या वेळी येत असे. परंतु त्यांचे मित्र रवींद्र ढवळे यांना नाटकाची आवड होती. उपेंद्र दाते त्यांच्याबरोबर प्रॉम्पटिंग करायला जायचे. त्यावेळी उपेंद्र दाते अकाउंट्सचे क्लास घेत असत, आणि त्यांनी नाशिकमध्ये कॅटरिंगचा व्यवसाय सुरु केला होता . ते म्हणतात की नाशिकमध्ये कॅटरिंगचा व्यवसाय करणारा मी पहिलाच होतो.

त्यांचे मित्र रवींद्र ढवळे यांनी ‘ नाट्यनम्रता ‘ नावाची संस्था काढली , त्यांनी उपेंद्र दाते यांना शं . ना . नवरे त्यांच्या ‘ डाग ‘ ह्या एकांकिकेत काम कर म्हणून सांगितले, कारण ते नाटक रवींद्र ढवळे यांनीच दिग्दर्शित केले होते. ह्या एकांकिकेनंतर उपेंद्र दाते यांना नाटकाचे वेड लागले. त्यानंतर उपेंद्र दाते यांनी त्यांचे मित्र प्रभाकर पाटणकर यांनी उपेंद्र दाते यांच्या अविनाश चिटणीस यांच्या ‘ बादशहा ‘ ह्या एकांकिकेत काम करण्यास सांगितले. त्याचे दिग्दर्शन बाबुराव सावंत यांनी केले होते. बाबुराव सावंत एक जबरदस्त व्यक्तीमत्व होते. वि . वा . शिरवाडकर यांनी त्यांचे ‘ नटसम्राट ‘ हे नाटक त्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले होते. परंतु ती भूमिका डॉ . लागूंनी केली . त्या नाटकात बाबुराव सावंत यांनी विठोबाचे काम केले. परंतु दुर्देवाने ‘ नटसम्राट चा पहिला प्रयोग झाला आणि बाबुराव सावंत रंगपटात गेले आणि त्यांना तीव्र हार्ट अटॅकचा झटका आला आणि तेथेच त्यांचे निधन झाले.

उपेंद्र दाते यांच्या बाबतीत अशा अनेक घटना घडल्या एक घटना अशी घडली की प्रमुख भूमिका तुम्ही करा म्ह्णून त्यांना एकदा घरी नाशिकला तार गेली , परंतु मुंबईला गेल्यावर ती भूमिका दुसऱ्याला दिली गेली आणि त्याच नाटकात त्यांना दुय्यम भूमिका मिळाली. ती भूमिका त्यांना मिळाली असती तर ? त्यामुळे त्यांना त्यांचे नाशिकचं बरे असे वाटू लागले. त्यांनी ज्या ‘ रायगडाला जेव्हा जाग येते ‘ या नाटकात काम केले त्या नाटकांच्या तालमीला वसंत कानेटकर येत असत त्यांना त्यांचे काम आवडले होते. ते म्हणाले , ‘ तू मुंबईला का जात नाहीस ? ‘ तेव्हा उपेंद्र दाते यांनी त्यांना उत्तर दिले नाही , कारण मुंबईमधील नाट्य -चित्र सृष्टीमधील दोन -चार कटू अनुभव गाठीला होते . वा . रा. सोनार यांच्या ‘ बुडत्याचा पाय खोलात ‘ या नाटकात त्यांनी काम केले होते त्या नाटकाला राज्यस्पर्धेचे दुसरे बक्षीस मिळाले . अर्थात त्यावेळी त्यांची इतर नाटके चालत होती परंतु दुय्यम भूमिका त्यांचा वाट्याला येत होत्या ही खंत त्यांच्या मनाला सतत जाणवत होती. त्यांच्यामध्ये आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यामध्ये विलक्षण साम्य होते त्याबद्दलचा एक किस्सा ते सांगतात ‘ काचेचा चंद्र ‘ नाटक जेव्हा करायचे ठरले तेव्हा पहिल्या अंकातील डॉ . श्रीराम लागू यांचे काम उपेंद्र दाते यांनी करावे आणि पुढील अंक डॉक्टरांनी करावे असा विचार कुणाच्यातरी मनात आला कारण पहिल्या अंकात दाखवलेल्या डॉक्टरांची भूमिका तरुणाची होती अर्थात ते संपूर्ण नाटक डॉक्टरांनीच केले . जर तसे झाले असते तर मराठी रंगभूमीवरील कदाचित तो वेगळा प्रयोग ठरला असता.

उपेंद्र दाते यांनी अनेक नाटकांमधून भूमिका केल्या त्यात त्यांचे ‘ सारे प्रवासी तिमीराचे ‘ या नाटकात त्यांनी केलेली सुजीतची भूमिका खूप गाजली. त्यांनी महेश एलकुंचवार यांची तीन नाटके केली त्यात ‘ सुलतान ‘ होळी ‘ ह्यांचा समावेश होता.

त्यांना अनेक नाटकांमधून काही भूमिका करण्याच्या होत्या परंतु कोणत्या ना कोणत्या कारणानी त्या करतात आल्या नाहीत. खरे तर ते १९७२ पासून पूर्णवेळ नाट्यकर्मी म्हणून या कला कलाक्षेत्रात आहेत. परंतु कुठे तरी काही नाटकातून प्रमुख भूमिका कराव्यात असे त्यांना मनापासून वाटत होते परंतु त्यावेळी त्या संस्था दुसऱ्याच्या असल्यामुळे त्यांनी नाशिक येथे त्यांनी ‘ रंगमंच ‘ नावाची संस्था काढली होती . मुंबईला आल्यावर त्यांनी त्या संस्थेतर्फे सुमारे २५ नाटके केली . ह्या कामात त्यांना त्यांच्या पत्नी जयश्री यांनी मोलाची साथ दिली. ती नसती तर मी इतके काही करू शकलो नसतो असे ते म्हणतात. त्यांच्याबरोबर अनेक वेळा त्यांची मुलगी रसिका दाते हिनेही खूप नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.

उपेंद्र दाते यांनी अनेक मान्यवर संस्थांमधून ५७ व्यावसायिक नटांमधून भूमिका केल्या. त्यामध्ये नटसम्राट , रायगडाला जेव्हा जाग येते , प्रेम तुझा रंग कसा, सं . एकच प्याला , प्रेमाच्या गावा जावे , गरुडझेप अशी नवे आहेत. त्यांनी आभाळमाया , बंधन , दामिनी , मर्मबंध असा इकून २७ मालिकांमधून कामे केली.

उपेंद्र दाते यांनी १६ चित्रपटांमधून विविध भूमिका केल्या आपण याना पाहिलत का ?, बाईलवेडा , मर्मबंध अशी काही चित्रपटांची नावे आहेत. त्यांना वसंत कानेटकर , वि . वा . शिरवाडकर , बाबुराव सावंत , प्रभाकर पणशीकर , मधुकर तोरडमल , प्रमोद पवार , डॉ. बाळ भालेराव , राजन पाटील , अरविंद देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

उपेंद्र दाते दाते सध्या रागडाला जेव्हा जाग येते , चि . आईस , आई रिटायर होतेय , एकपात्री नटसम्राट , तरुण तुर्क म्हतारे अर्क या नाटकातून कामे करत आहेत. त्यांनी तरुण तुर्क हे नाटके जेव्हा केले तेव्हा त्यांना प्रा. मधुकर तोरडमल यांनी मोलाची मदत केली. त्या नाटकाचा ५००१ वा प्रयोग त्यांनी पुण्यात केला. आजही अनेक वेळा एकांकिकांच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून जातात , नाटकांसंबंधी जे जे करण्याची संधी मिळते ते निष्ठेने करतात.

उपेंद्र दाते यांना वसंत कानेटकर स्मृती तर्फे ‘ रंगकर्मी ‘ पुरस्कार दिला , मुंबई मराठी साहित्य संघाचा ‘ नाट्यगौरव पुरस्कार , राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या तीन नाटकांना रौप्य पदके मिळाली . त्याप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अशा या रंगकर्मी उपेंद्र दाते यांना ‘ नाटक ‘ स्वस्थ बसून देत नाही. पदराला खार लावून ते आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या संस्थेतर्फे जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन आजही करत आहेत . त्याचप्रमाणे हल्ली ते फेसबुक LIVE वरून त्याचा नाट्यप्रवास आणि अनुभव उलगडून सांगत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..