नवीन लेखन...

आनंदमयी प्रवासासाठी: प्रवास विमा

जगातील विविध देशांतील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी फिरणे हा एक वेगळाच आनंद देणारा अनुभव असतो. हा आनंद निखळ असावा यासाठी आपण व्हिसा फॉर्मेलिटीपासून आपल्या टूर पॅकेज मधील सर्व सुविधा बाबतीत पुन्हा पुन्हा खात्री करून घेत असतो. […]

समर्पण

फुलांसारखे फुलत जगावे ब्रह्मांडाला गंधाळीत रहावे सृजनाचा अविष्कार आगळा विश्वात्म्याला सदैव स्मरावे… विलोभनिय ही अदा सृष्टीची त्या सौंदर्यात भुलुनी जावे साक्षात्कार सारा चैतन्याचा सुखामृताला प्राशित रहावे… निसर्गाचेच तत्व निरागस ते हॄदयांतरी जपत रहावे जीवा जगवितो तो कृपाळू निरंतर त्याला भजत रहावे… फुलांसारखे फुलता फुलता निर्माल्यातही सुख मानावे समर्पणात सौख्य आल्हादी याचे भान नित्यची असावे… ******** — […]

आवाज की दुनिया

माणूस जन्माला आल्यापासून तो आवाजाशी जोडला जातो. आवाज आहे, तर कुणाचं तरी अस्तित्व सोबत आहे हे समजून येतं. अगदी पहिला आवाज तो ऐकतो स्वतःच्याच रडण्याचा. मग त्याला ऐकू येते का? ते पहाण्यासाठी खुळखुळा सारखी खेळणी घरात आणली जातात. कुणी पाळण्याजवळ येऊन ते वाजवलं की, ते बाळ त्या दिशेला नजर वळवतं. […]

गरिबांचा संसार

संसार म्हटले की कटकटी या आल्याच या संसारामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटा संसार यामध्ये मुला मुलींची संख्या एक किंवा दोन असते. वडिलांच्या पासून काही ना श्रीमंती लाभलेली असते याला छोटा संस्था म्हणतात. मोठा संसार म्हणजे घरात दहा पंधरा माणसे त्यात मिळवणारे कमी लहान मुलांचा व मुलींचा कपडा लता. शाळेची फी पाटी पुस्तक या वस्तू आल्यास या वस्तू असल्याशिवाय शाळा शिकता येत नाही. माणूस जगायचा झाला तर त्याला अन्न, वस्त्र, व निवारा या तीन गोष्टी असल्या म्हणजे माणूस जगू शकतो. […]

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरे

कोकणात घरांच्या रचनेमागे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथले वातावरण, जेव्हढे ऊन तेवढाच पाऊस. ओल्या दमट आणि गरम हवामानामुळे घरांमध्ये नैसर्गिक गोष्टींचा पारंपारिक पद्धतीने वापर केला जातो. पावसामुळे घरांमध्ये महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हणजे उतरत्या कौलांची घरे. या मातीच्या कौलांमुळे धुवांधार पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होते आणि कडक उन्हाळ्यात देखील घरातील हवा थंड राहते. […]

भावनांचा गहिवर

विसावता क्षितिजी तेजोगोल अस्ताचलावर केशररंगी अंबर मनभावनांची उलघाल अंतरी सावळबाधी सांजाळ वेदिवर…. मंदमंद धुसर ती कातरवेळा जीवनसंध्येचा हा भास सुंदर घोंगावते आठवांचे मोहोळ उभा सामोरी तो मुरलीधर… अंतर्यामी आज घुमते पावरी लोचनी तरळतो श्यामलसुंदर आज आठविती मित्र सगेसोयरे उचंबळतो भावनांचा गहिवर… ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३२८ ११/१२/२०२२

एव्हरग्रीन चंद्रशेखर

मी देव आनंदचा जबरदस्त फॅन आहे. लहानपणापासून मी त्यांचे चित्रपट पहात मोठा झालो. त्याचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट पासून सप्तरंगी चित्रपटही पाहिले, साठवणीतल्या आठवणीत ते जपून ठेवले. […]

मडेलिना सेरसूओलो दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

मडेलीना चा जन्म 2 फेब्रुवारी 1920 रोजी नेपल्स इटली येथे एका मध्यमवर्गीय कामगारांच्या पोटी झाला.तिचे वडील कारलो कूक होते. ते एका कंपनीत काम करत होते ती कंपनी बंड पडली. त्यानंतर त्यानी स्वताचे पिझ्झाचे दुकान काढले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा मडेलिना एका बुटांच्या कंपनीत काम करत होती. […]

बचत आणि गुंतवणूक

गुंतवणूक करणे म्हणजे जमिनीत आंब्याचे बी पेरण्यासारखे असते. बी पेरून त्याची योग्य निगराणी करावी लागते, अनेक वर्षे वाट पाहावी लागते, तेव्हा त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. हा वृक्ष नेमका किती मोठा होईल व किती वर्षांनी आंबे येतील हे आधीच अचूक सांगता येत नाही. […]

निर्मळ जीवन

जन्मोजन्मीचा हा जन्म मानवी हसत सरावा उधळीत सुखाला मनी नसावा भाव दुजेपणाचा क्षणोक्षणी जपावे मनामनाला साधेसुधे निर्मळ जीवन असावे शांतवीणारे तनमनांतराला भौतिक सुखदा ही क्षणभराची असो शाश्वताचा ध्यास जीवाला आत्ममुख आपण होत रहावे उगा दोष देवू नये कुणाला जीवाजीवा प्रेम देत जगावे जगी जपत रहावे मानवतेला ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३२७ १०/१२/२०२२

1 2 3 4 5 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..