नवीन लेखन...

हिंद केसरी मारुती माने

कोणत्याही क्षणैक वलयाच्या मागे न लागता माने यांनी आयुष्यभर कुस्ती हेच आपले ध्येय ठेवले आणि त्याप्रमाणेच ते वागत आले. लाल मातीमध्ये रंगून जाणाऱ्या या बलदंड माणसाच्या मनाचा एक कोपरा हळुवार होता आणि तो हळवेपणा त्यांच्या बासरीवादनातून व्यक्त होत राहिला. […]

अभिनेते अजय वढावकर

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला. मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना […]

ज्येष्ठ मराठी व हिंदी साहित्यिक ज्योत्स्ना देवधर

त्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते. […]

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान

एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी थिएटरच्या क्षेत्रात करियरबद्दल गांभीर्याने विचार करण्यास सुरूवात केली. त्या काळात पेसी खंडवाला यांच्याशी झालेली भेट ही त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली आणि नंतर दोघांनी एकत्र काम करून अनेक नाटके केले. […]

कथाकार आणि कादंबरीकार कुसुम अभ्यंकर

कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते. […]

कादंबरीकार सुरेश जनार्दन द्वादशीवार

आसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. […]

अभिनेते व नेपथ्यकार राजन भिसे

दिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत. […]

कैलास दर्शन – भाग 3

रात्रीच्या गप्पांमध्ये खडसे साहेबांनी सांगितले होते की या विश्रामगृहाच्या मागच्या बाजूने एक छोटीशी दीड दोन फूट रुंदीची कॉक्रीटची पाय वाट आहे ती थेट वेरुळाच्या कैलास मंदिराच्या माथ्याच्या उंचीपर्यंत जाते आणि तिथून जगातील एकमेव असे ते डोंगरातून खोदून काढलेले परंतु एक स्वतंत्र इमारत आहे असे वाटणारे मंदीर फार छान दिसते. […]

एक परीस स्पर्श ( भाग – २१ )

आज विजय बस स्टॉपवर उभा होता. तोच त्याची नजर रस्त्याच्या कडेला नारळाच्या झावळ्यांपासून झाडू बनविणाऱ्या स्त्री पुरुष आणि लहान मुलांकडे गेले. तर एक मुलगी तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवत होती. चहा बनविण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. ते पाहून विजयला त्याचे बालपणीचे दिवस आठवले! त्याची आई अशीच चुलीवर चहा बनवत असे आणि विजय बटर घेऊन तिच्या बाजूला बसलेला असे. […]

पुरखुती मुक्तांगण (उगवता छत्तीसगड – २)

हा संपूर्ण परिसर म्हणजे एखादे नन्दनवनच आहे. सूर्यास्ताच्या संधीप्रकाशात उजळून जाणारा जलाशय म्हणजे चित्रकाराचे दिवा स्वप्नच आहे असे वाटते.जलाशयाच्या बाजूनी उत्तम बाग, नाना तर्हेच्या फुलांचे,  हिरव्यागार झुडपांचे ताटवे ह्यांची लागवड केली आहे. हा नयनरम्य आनंद मनमुराद लुटण्यासाठी छत्तीसगडपर्यटन विभागाने  शिशवी रंगात राहण्यासाठी  प्रशस्त कॉटेजीस् तयार केली आहेत. […]

1 2 3 4 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..