नवीन लेखन...

राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी….

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मूळ स्वरुपाच्या विरोधात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी निवडणूक प्रक्रियेला दूषित करतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध सूचना दिल्या असूनही कोणताही राजकीय पक्ष त्याच्या वतीने गुन्हेगारी घटकांच्या उन्मुलनासाठी पाऊल उचलताना दिसत नाही. […]

खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी,   ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या,   जसे ग्रहमंडळ फिरती…१, मित्र मंडळी सगे सोयरे,  शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी,   परिणाम ते होई सर्वांचे…२, हेच सर्व ते ग्रह असूनी,  सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची,   वागण्यात तो फरक करती…३ अपयशाला कारणीभूत तो,  असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ,  ग्रहमान बनतो त्या घडीचा…४, […]

आ री आजा, निंदिया तू ले चल कहीं !!

केव्हाही, कोठेही हे गीत ऐकले की आत काहीतरी अनामिक कालवाकालव होते. बापाची लेकासाठीची धडपड डोळ्यांसमोर येते. ती खोटी, फसवी असू शकत नाही (भलेही चित्रपटात ती बऱ्यापैकी बटबटीत दाखविली असली तरी ! ).आणि दरवेळी बापाने अंगाई म्हणायलाच हवी असे कुठाय? त्यासाठी त्याने कुठून आणायचा किशोरचा “सोलफूल ” आवाज ? शेवटी बापाला स्वतःची धडपड, धावाधाव असतेच की ! […]

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।।  १ आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।।  २ एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  […]

जीवन मृत्यू खेळ

सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव ,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४ — डॉ. भगवान […]

तुम हो तो हर रात दिवाली, हर दिन मेरी होली हैं !

“जैत रे जैत” मधील “जांभूळ पिकल्या झाडाखाली —- ” ची नजाकत जावेद अख्तरने – ” होली आई ,होली आई, देखो होली आई रे ” मध्ये बरहुकूम आणली आहे. संपूर्ण गाणं रंगछटांनी भरल्यावर, विशेषतः पिकलेल्या जोडीने ” तुम हो तो हर दिवाली, हर दिन मेरी होली हैं ” हे जीवनोत्सवावर भैरवी भाष्य करणं आणि यातून त्यांचे अभिन्नत्व दाखविणे हे फक्त केवळ ! […]

उदबत्ती – एक आत्मसमर्पण

उदबत्तीचा सुगंध    दरवळे चोहोकडे कोठे लपलीस तूं      प्रश्न मजला पडे  १   मंद मंद जळते     शांत तुझे जीवन धुंद मना करिते    दूर कोपरीं राहून  २   जळून जातेस तूं    राख होऊनी सारी तुझे आत्मसमरपण    सर्वत्र सुगंध पसरी  ३   तुझेपण वाटते क्षुल्लक    दाम अति कमी आनंदी होती अनेक     जेव्हां येई तूं कामीं  ४   लाडकी तूं […]

कठीण खेळ

चंचल केलंस मन,    स्थिर करण्यासांगे  । दिलेल्या गुणाची मग,   बदलेल कशी अंगे ? निसर्ग नियमाच्या,   कोण विरूद्ध जाईल  । फायद्याचे ते का त्याचे परि होईल ? चपळता जसा गुण,  स्थिरपणा असे दुजा  । आगळ्यातील आनंद,  हिच त्यातील मजा  ।। देहा ठेवून चंचल,  सांगे स्थिरावण्या मन  । हा उलटा खेळ कसा,  खेळण्या भासे कठीण  ।। डॉ. भगवान […]

हसण्यावारी नेऊ नका

आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्‍याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो. […]

ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील

महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे अनेक भक्तीगीते व भावगीतांचे ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील यांचं आगरी-कोळी बोलीभाषेतील साहित्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. २००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. […]

1 2 3 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..