नवीन लेखन...

पोटभरू पाखरू मी

कितीक गावांच्या अंगणात रमलो स्थिर कुठेच  होऊ शकलो नाही     || पोटभरू पाखराची भटकंती ती दानापाणी सरता थांबू शकलो नाही   || भरभरून दिले त्या माणसांनी घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही    || मायेचे झरे या माणसांच्या मनात दुस्वास त्यांचा करू शकलो नाही      || साधी भोळी माणसे होती फार ती माणसांना अंतर देऊ शकलो […]

नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडते

सतत काहीतरी नवीन शिकण्याने आपल्या मनाला ताजेतवाने वाटते. वयाची मर्यादा न बाळगता आपल्याला जे आवश्यक आहे, जे आपल्या ध्येयाप्रती गरजेचे आहे किंवा जे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी आहे ते शिकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ८

चैनीखातर शिकणारी मुले आणि उपाशीपोटी राहून शिक्षण घेणारी मुले गुरुजींना पाहण्यास मिळत होती. त्यांना स्वतः:चे दिवस आठवले, “या दिवसांनी गुरुजींना एक शिकवण दिली होती, “विद्यार्जन हे कठीण व्रत असते , त्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतात तेंव्हा कुठे हे विद्याधन प्राप्त करता येते ..! ” […]

विड्याच्या पानांचे महत्त्व जाणून घ्या

पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात हक्काने आढळणारी गोष्ट म्हणजे विडाच्या पानाचा डब्बा. ज्यामध्ये ताजी विड्याची पाने, चुना, कात, सुपारी आणि अडकित्ता ठेवलेला असायचा. रोजच्या जेवणानंतर किंवा एखाद्या मेजवानीनंतर घरातील सर्व जण मिळून विड्याचे पान खायचे. विड्याची पाने आणि त्यामध्ये असलेल्या इतर पदार्थांमुळे शरीरात अन्नाचे पचन नीट होण्यास मदत होते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा पूर्वीपासून आपल्याकडे आहे. […]

गृहित

रात्र येत राहते दिवस येत राहतो आपण गृहितच त्यांना धरत राहतो असेच महिने येत राहतात असेच वर्ष जात राहतात आपण गृहितच त्याना धरत राहतो केस पांढरे अंगावर सुरकुत्या पाठीत बाक लटपटणं वगैरे होत राहते मग आपल्याला गृहित धरत राहतात ते रात्र दिवस माहे साल काळाचे घटक येत जात राहतात ……आपण कुठे कुठेच गृहित धरायला नसलो तरी […]

देशभक्तीची लाट

देशभर देशभक्तीची लाट आली वाटतं कुणी जवान शहीद तर झाला नाही ना! अनोळखीचा बिल्डर नमस्कार करतोय येत्या इलेक्शनला उभा राहणार तर नाही ना? जास्तच जरा बोलणे गोड वाटले त्याचे उधारबिधार नाहीतर काही काम तर नाही ना? (कुरकुरतं …. शरीर नाही पेलवत पेग पुढचा एकच ब्रँड सारखा बोअर झाला तर नाही ना?) मंदिर प्रश्न पुन्हा येत आहेत […]

वियोग

सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।।१।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।।२।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।।३।। दाखव प्रेम त्याच ठिकाणी, […]

रिक्त प्रेमाचा घट

रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट   लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   ईच्छा उरली […]

धोकादायक

महानगरपालिकेने धोकादायक इमारतीतील रहिवाश्याना इतरत्र हलविले आणि काही पाखरांनी तेथेच संसार मांडले — श्रीकांत पेटकर 

रुद्रा – कादंबरी – भाग ८

बदल्याची आग घेऊन मनोहर संतुकरावांचा माग काढत मुंबईत पोहंचला. जमेल त्या प्रकारे त्याने संतुकरावची सखोल माहिती काढली,आणि समोर जे आले ते अविश्वसनीय होते! […]

1 20 21 22 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..