नवीन लेखन...

डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?

लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्‍या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ? […]

म्हणूं नका

लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका ! मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।। खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ? राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।। नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।। अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ […]

सुवर्णमहोत्सव राज्याचा : १ मे, २०१०

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें. १. सुवर्णमहोत्सव हा सुवर्णाक्षरांनी लिहा क्रमांक पहिला’ फलक वाहा असूं देत क्रम नऊ-दहा. ‘महाराष्ट्र हें राज्य महा’ फलद्रूप होईल मंत्र हा अनंत वाट पहा ।। २. नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति….१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति….२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी […]

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. […]

‘मी मराठी’ असल्याचा अभिमान

पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारित खालील उतारा ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केला होता. तो आपल्यासाठी पुन्हा एकदा. महाराष्ट्र दिनाच्या सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशेषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती.. ‘..मुघल काय किंवा इंग्रज […]

जखमांचे वृण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

1 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..