नवीन लेखन...

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – ४

पुढे मुंबईलाच परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Bombay Veterinary College) १९८० ते १९८४ मधे पशुवैद्यक पदवी शिक्षण पूर्ण केले. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे एशिया खंडातले सर्वात जुने (१८८६ साली ब्रिटीशांनी सुरु केलेले) पशुवैद्यकीय महाविद्यालय. त्याला जोडूनच असलेले सुसज्ज पशु इस्पितळ. जुन्या दगडी इमारती आणि भरपूर झाडीने भरलेल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणामधे (Campus) आल्यावर आपण मुंबईत आहोत यावर […]

क्षण

‘क्षण’ दिसायला दोन अक्षरे चुकीच्या निर्णयाने क्षणात जीवन मातीमोल करे ! चांगल्या बेरजा क्षणाच्या वजाबाक्या वाईटाच्या, कधी गुणाकार कधी भागाकार ! क्षणाच्या विलंबाने चुकते प्लेन, चुकते ट्रेन, निसटते संधी, आयुष्यात येते आंधी ! मनाच्या चलबिचलतेने क्षणार्धात सुटतो तोल, होत्याचे नव्हते करण्या उद्युक्त करतो क्षण ! त्याच क्षणाला सावरायला हवे क्षणाक्षणाला मन भानावर हवे, जगण्याच्या चांगल्या उमेदीने […]

संघर्ष !

निसर्गाचा मानवाशी संघर्ष, प्राणीमात्रांचा मनुष्याशी संघर्ष ! जीवन जगणे म्हणजेच संघर्ष, जगण्यातील अर्थ म्हणजेच संघर्ष ! संघर्षाची काही ठोस व्याख्या नाही, कलियुगात माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नाही, संघार्षावाचून माणसाला जगणे शक्य नाही ! संघर्ष जगण्याची आशा दाखवतो, जीवनातील संघर्षात माणूस शहाणा होतो ! संघर्षात जीवन तावून सुलाखून निघते, आणि सोन्यासारखे स्वच्छ होते ! संघर्ष म्हणजे स्पर्धा, स्पर्धा […]

किडनी स्टोन्स (Kidney stones) आपण टाळू शकतो का?

किडनी स्टोन्स म्हणजे काय? लघवी मधील काही घटकांपासून कठीण कण जमा व्हायला लागतात. त्यांचे एकावर एक थर जमा होऊन मूतखडा तयार होऊ लागतात. ते विविध आकारात आढळतात, धान्या एवढा बारिक तर कधी मोत्या एवढा मोठ्ठा सुद्धा असू शकतो. बर्याच जणांत जास्त त्रास न होता हे स्टोन्स शरिराच्या बाहेर टाकले जातात पण काही वेळेस असे होताना दिसत […]

वाईट व्यसनांच्या विळख्यात !

इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली. दिनांक १८ जुन २०१५ रोजी मालाड, मालावणी येथे विषारी दारू पिऊन १३ जणांना प्राण गमवावे लागले ही बातमी वाचनात आली. असा दुर्दैवी अंत एखाद्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलणाऱ्या प्रमुखाचा झाल्यास त्या कुटुंबावर काय बिकट प्रसंग […]

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून वयाची पन्नाशी ओलांडली की किमान ५० % लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी. अगदी लहान वयात होणारे सांध्यांचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचे गांभीर्य विशेष नसते व ते खास औषधोपचार न करताही बरे होतात. तरुण वयात आणि उतार वयात होणारे सांध्यांचे विकार मात्र त्रासदायक ठरतात, आयुष्यभर सतावतात. सांधेदुखीची सविस्तर माहिती साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत […]

डॉ. शांताराम कारंडे – एक मित्र

डॉ.शांताराम कारंडे आणि माझी पहिली भेट एका कवी संमेलनात झाली होती. त्या कवी संमेलनाचे आयोजक तेच होते. तेंव्हा पहिल्या भेटीतच ते मला भावले होते. मला जो भावतो तो कोण आहे कसा आहे ही गोष्ट माझ्यासाठी गौण असते. मला जो भावतो त्याचा मी त्याच्या गुणदोषासह स्विकार करतो. पण डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील फक्त गुणच माझ्या दृष्टीक्षेपात आले. त्या […]

गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – ३

माझा जन्म मुंबईचा. आयुष्याची साधारण ३० वर्षं मुंबईत काढलेला मी एक अस्सल मुंबईकर आहे. आई वडिलांच्या दोघांच्याही बाजूने वकीली आणि शिक्षकी हे दोन महत्वाचे पेशे. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमधे काहीजण डॉक्टर्स किंवा इंजिनिअर्स, बरेचसे पोस्टग्रॅज्युएट्स आणि काहीजण Ph.D. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला सर्वस्व मानणारं. बहुतेक सारेजण मुंबई, पुण्यात स्थिरावलेले. त्यामुळे या सार्‍या शहरी वातावरणात, गावरान वारा लागण्याचं […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौरा: भारत बांगलादेश संबंध नवीन वळणावर

मोदी सरकारने परराष्ट्र धोरणावर भर देऊन जागतिक संबंध सलोख्याचे व्हावेत, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मोदींच्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्यामुळे जे वातावरण बांगलादेशमध्ये पाहावयास मिळाले, ते दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करणारेच आहे. जमीन हस्तांतरण करार ४१ वर्षांपासून प्रलंबित बांगलादेश आणि भारताच्या मध्ये ब्रम्हापुत्रा नदी आणि तीची इतर पात्रे आल्यामुळे अनेक ठिकाणी बांगलादेशची काही लोकसंख्येची भारतीय खेडी/वस्त्या […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..