संवर्धन मराठीचे
मराठी भाषेचा विकास व्हावा, तिचे संवर्धन व्हावे, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापुरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने अनोखी संकल्पना साकारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्या आवारात मराठी ग्रंथदालन उभारण्याची योजना आकारास येत आहे.
[…]

‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ ही संतांची उक्ती त्याची सत्यता किती दृढ करते हे आतापर्यंतच्या आपल्या श्री गणेशाबरोबरच्या प्रवासातून लक्षात आलेच असेल. आता पर्यंत आपण विविध देशातील श्री गणेशांची माहिती मिळविली. त्याबरोबर आता आपण आपल्या राज्यातील आणि भारतातील गणेशांची माहिती मिळविणार आहोत.