नवीन लेखन...

लग्नांच्या गोष्टी !



|| हरि ॐ ||

समाजिक हीत डोळ्यापुढे ठेऊन समाजाच्या भल्यासाठी काही चुकीच्या रुढी, परंपरा, बुरसटलेले विचार किंवा अंधश्रद्धा या सबंधित खऱ्याअर्थाने जनजागृती करण्याचे आणि त्यासाठी चळवळी उभारण्याचे काम सध्याच्या जगात नाटक, सेनिमा, पथनाट्य, फेसबुक, ट्विटरसारखी इतर माध्यमे करतात. परंतू त्या कितपत जनतेची मानसिकता बदलण्यास मदत करून जनतेच्या कृतीतून प्रकार्ष्याने किती समोर येतात हा संशोधनाचा विषय आहे.

सध्या सर्व टीव्ही चॅनल्सवर बहुतेक मालिकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एखाद घर, कुटुंब, माणसे, त्यांचे एकमेकांशी संबंध, ताणतणाव नाहीतर सासू सुनेच भांडण. या विषयांशिवाय गाडी पुढे जातच नाही. परंतू सध्या ‘झी’ वाहिनीवरील ‘दुसऱ्या लग्नाची गोष्ट’ मध्ये घनश्याम-राधाने दोन्ही घरच्यांना विश्वासात न घेता केलेल्या कॉन्ट्रक्ट मॅरेजमुळे त्यांच्या जीवनात किती तडजोडी, अडचणी आणि त्यावर मात करतांना पदोपदी खोटे बोलावे लागल्याने मनात होणारी कालवाकालव, घरात निमार्ण झालेला ताणतणाव आणि सुप्तावस्थेत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त न करता येण आणि त्यांनी झालेला कोंडमारा दाखविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. रोजच्या जीवनात किंबहुना बऱ्याच वेळा असे घडत असावे? कारण युवापिढी काहीश्या वरील विषयाशी सुसंगत वेगळ्या वाटा चोखाळायला लागल्यात की काय असा संशय येत आहे. देशातील तरुण पिढीवर सगळ्यांचाच पूर्ण विश्वास आहे, ती नक्कीच हुशार आहे, काय चांगले काय वाईट हे त्यांना कळते पण वळत नाही आणि म्हणून हा प्रपंच. असो.

धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक संस्कार असून त्याद्वारे दोन भिन्न व्यक्तीमत्वांचे मिलन होते. त्या मिलनातून वंशवृद्धी साध्य करून आत्मसंयम, आत्मत्याग, परस्पर साहचर्यामधून दोघांचा आत्मोद्धार आणि दोन घराण्यांचे परस्परांशी कायमचे सुद्रुढ नातेसंबंध जोडणे हा विवाह संस्काराचा मूळ हेतू असतो आणि आहे.

भारतात वर्षोनुवर्षे चालत आलेले लग्नाचे बरेच प्रकार आणि पद्धती आहेत पण सध्या प्रचलित आणि माहित असलेले प्रकार पुढील प्रमाणे १) अॅरेंज मॅरेज २) प्रेम-विवाह ३) आंतरजातीय विवाह (देश/विदेश) आणि पद्धती पुढील प्रमाणे १) गांधर्व-विवाह २) वैदिक ३) कोर्टनोंदणी आणि ४) प्रासंगिक कराराने. सध्याच्या जमान्यात लग्नासारख्या पवित्र बंधनाची व्याख्या, तत्वे, कायदे, आणि बंधने जरा हटके वाटण्याइतपत कुठेतरी भरकट तर नाहीत ना? असे एकंदरीत सर्वच तरुणाईच्या लग्नासारख्या पवित्र आणि शुद्ध बंधनाच्या कृती आणि विचारसरणी वरून जाणवायला आणि भयभीत करायला लागले आहेत. काही पुढारलेल्या माणसांच्या मते लग्न हा पवित्रविधी आणि संस्कार आहे पण तो एक करार पण असू शकतो. आणि तश्या कृती वधू-वरच्या संमतीने पार पडत आहेत. मग ते लिखित किंवा अलिखितही असू शकतात. त्याला कायद्याचे बंधन आहे. आज काही तरुणांचे संसार विस्कळीत होत आहेत, मूल-मुली काडीमोड (डिव्होर्स) घेत आहेत कोर्टात काही शेकडोनी खटले प्रलंबित आहेत. या सगळ्याला जबाबदार आहेत स्वत: वधू-वर कारण श्रद्धा-सबुरीचा अभाव, तारुण्यात झपाटलेल्या लग्नाबद्दलच्या चुकीच्या संकल्पना आणि चुकीच्या मार्गदर्शनाने स्वीकारलेले मार्ग.

कलीयुगात लग्नाच्या संकल्पना बदलत असतांना लग्न करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख गोष्टींची आदलाबदल करून लग्न केली जात आहेत. त्यात गे लग्न, समलिंगी विवाह, लिंग बदलून विवाह अश्या अ-नैसर्गिक विवाहांना काही तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. परंतू ते हे विसरतात की कायद्याने जरी परवांगी असली तरी वंशवृद्धी साध्य करून आत्मसंयम, आत्मत्याग आणि परस्पर साहचर्यामधून दोघांचा आत्मोद्धार, सामाजिक आणि वैचारिक बंधने, शारीरिक स्वाथ, समाधान, यांना छेद देऊन अ-नैसर्गिक संबंधने विवाहासारख्या पवित्र आणि शुद्ध बंधनाला कुठेतरी तडा जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच एका मुलाने स्वत:चे लिंग, हार्मोन्स आणि बाह्यता स्त्रीत्व सिद्ध करण्याचा खटाटोप करून विवाह करण्याचा मानस व्यक्त केला असला तरी नैसर्गिक स्त्रीचे वात्सल्य, प्रेम, माया, करुणा आणि स्वभाव वैशिठ्ये येणार नाहीत. आणि मुख्य म्हणजे वंशवृद्धी होणार नाही. मग असे विवाह किती काळ टिकतील याचे उत्तर येणारा काळच देईल. अश्या विवाहास कायद्याचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने परवांगीही दिली. परंतू स्त्रीचे मन काही त्या व्यक्तीत उतरणार नाही हे १०८ टक्के नक्की. जगात सर्वच गोष्टी कायद्याच्या धाकाने झाल्या असत्या तर आज सामान्य माणसांची अशी दुरवस्था झाली नसती.

माणसांना क्षणिक सुख आणि वासनापुर्तीचा आनंद आणि पुढारलेल्या समाजाचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यात धन्यता वाटते. काहींना समलिंगी विवाह करण्यात रस आहे. ही भारतीय संस्कृती नक्कीच नाही आणि भारतात कुठल्याही धर्माची मान्यताही नाही. मानव, पशु, पक्षी, आणि किटकांची वंशवृद्धी आणि नैसर्गिक वाढ सातत्याने आणि निकोप प्रजोत्पादनासाठी भिन्नलिंगी जीव परमेश्वराने निर्माण केले. याचाच अर्थ त्यालासुद्धा समलिंगी संबंध अभिप्रेत नाहीत. नाहीतर एकच लिंगी मानव परमेश्वराने जन्माला घातला असता.

अश्या एकंदरीत विवाह संस्कारांचे परिणाम नवीन तरुण पिढीवर काय होतील याचा कोणीही विचार केलेला दिसत नाही. पण येणाऱ्या पिढीचा विचार करता हे कुठेतरी थांबावे असे वाटते. निदान समुपदेशाने फायदे-तोटे आणि गुण-दोषांचे सविस्तर चर्चे अंती अभ्यास, मनन, चिंतन व आकलन करून विचारान्ती काय करायचे हे ज्याने त्याने ठरवावे. प्रत्येकाला विचार व कर्म स्वातंत्र्य आहे आणि ते सर्वांना मान्य आहे.

<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प) — जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..